Next
‘पै आयटीसी’तर्फे संगणक प्रशिक्षकांचे राज्यव्यापी प्रशिक्षण
प्रेस रिलीज
Monday, June 03, 2019 | 03:50 PM
15 0 0
Share this article:


पुणे : पी. ए. इनामदार इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अॅकॅडमीतर्फे (पै आयसीटी) पुणे महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा आणि इतर शाळांमध्ये संगणक प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांसाठी राज्यव्यापी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 

प्रशिक्षणात ३१ जण सहभागी झाले होते. या उन्हाळी प्रशिक्षण वर्गाचा समारोप ३१ मे २०१९ला झाला. या तुकडीतील ११ गुणवान प्रशिक्षकांना महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते प्रत्येकी १० हजार रोख पारितोषिक देण्यात आले. हा कार्यक्रम आझम कॅंपस (पुणे कॅम्प) येथे झाला. 

राज्यभरातून आलेल्या या प्रशिक्षकांच्या पहिल्या तुकडीला हार्डवेअर, सॉफ्टवेअरमधील अद्ययावत कौशल्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. एक मेपासून १६ मेपर्यंत हे प्रशिक्षण आयोजित केले होते. राज्यातील साडेसात हजार विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षक अद्ययावत कौशल्ये प्रशिक्षणामुळे शिकवू शकतील. 

‘पै आयसीटी’च्या संचालक मुमताज सय्यद यांनी स्वागत केले आणि उपक्रमाची माहिती दिली. डॉ. इनामदार यांनी प्रशिक्षकांचे कौतुक केले. ‘गरीब आणि मागास विद्यार्थ्यांना संगणक क्रांतीद्वारे प्रगतीची मोठी झेप घेणे शक्य आहे. त्यामुळे संगणक प्रशिक्षण हा आपल्या शिक्षणात प्राधान्याचा विषय असला पाहिजे,’ असे प्रतिपादन त्यांनी केले 

शबाना सय्यद, अरिफ सय्यद, शमशेर सय्यद, पंकज शिंदे, नझीम शेख, आलिया सय्यद, निखत शेख या मुख्य प्रशिक्षकांनी पहिल्या तुकडीला संगणक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search