Next
अॅमेनोरा टाउनशिपमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा
प्रेस रिलीज
Friday, June 07, 2019 | 04:42 PM
15 0 0
Share this article:

पुणे : जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून अॅमेनोरा पार्क टाउनशिपमध्ये पाणी बचत आणि जलसंवर्धन हा विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्ताने अॅमेनोरा पर्सन स्कूलपासून पर्यावरण जनजागृती फेरी काढण्यात आली; तसेच गेटवे टॉवर्सजवळ १५० झाडे लावण्यात आली. जनजागृती फेरीत विद्यार्थ्यांबरोबरच या ठिकाणी काम करणारे कर्मचारी आणि नागरिक असे सुमारे ५०० जण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या ठिकाणी २००८मध्ये पर्यावरण जागरासाठी पर्यावरण मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरापर्यंत ही जनजागृती फेरी काढण्यात आली. 


या ठिकाणी सर्वांनी प्रमुख कार्यकारी अधिकारी (टाउनशिप डेव्हलपमेंट) कर्नल (निवृत्त) राजेंद्र केंजळकर यांच्यासमवेत पाणीबचतीसंबंधी प्रतिज्ञा घेतली; तसेच या विषयावर नाटुकले आणि माहितीपर खेळ सादर करण्यात आले. या खेळांमधील विजेत्यांना केंजळकर व प्रमुख कार्यकारी अधिकारी (टाउनशिप मॅनेजमेंट) कर्नल (निवृत्त) संजीव मुजुमदार यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search