Next
‘डॉक्टर्स डे’निमित्त पुण्यात डॉक्टर्सचा सत्कार
प्रेस रिलीज
Monday, July 01, 2019 | 03:40 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘डॉक्टर्स डे’निमित्त पुण्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. इनामदार मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये आज (एक जुलै २०१९), तर राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलतर्फे ३० जूनला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

इनामदार हॉस्पिटलमध्ये ‘डॉक्टर्स डे’निमित्त हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. परवेझ इनामदार यांच्या हस्ते सर्व डॉक्टर्सचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील दाते, डॉ. आर. के. शिंपी, डॉ. अमित शाह, डॉ. संजय साळुंखे, डॉ. सीमाब शेख, डॉ. क्वेदजोहर धारिवाल, डॉ. अश्विन बोराडे, डॉ. समीर शेख, डॉ. तस्लीम सय्यद, डॉ. निखील हिरेमठ, डॉ. संदीप पाटील, डॉ. आशिष चुघ, डॉ. प्रीतम भुजबळ उपस्थित होते. 


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर्स सेल पुणे शहर यांच्या वतीने नामवंत डाॅक्टरांचा सन्मान सोहळा ३० जूनला पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित केला होता. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे आणि राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर्स सेल पुणे शहरचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांच्या हस्ते शहरातील नामवंत आणि उपक्रमशील डॉक्टर्स, रुग्णमित्र आणि रक्तदान चळवळीतील संघटकांचा सत्कार करण्यात आला. यात पद्मश्री डॉ. सुदाम काटे, डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. किरण गद्रे, डॉ. अण्णासाहेब बिराजदार, डॉ. रवींद्र कोलते, डॉ. विश्वंभर हुंडेकर, डॉ. अजित कारंजकर, डॉ. फकीम तकमिली, डॉ. योगेश सातव, डॉ. उमेश फडे, डॉ. ज्ञानेश्वर शेळके, डॉ. रवींद्र कोलते, डॉ. प्रसाद राजहंस, नितीन कदम, डॉ. विनोद सातव, राम बांगड यांचा समावेश होता. 

या प्रसंगी बोलताना पद्मश्री डॉ. काटे म्हणाले, ‘पैशांअभावी आदिवासींना आवश्यक उपचार मिळत नाहीत. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सातपुडा भागातील आदिवासीच्या सिकल सेल व्याधीवर उपचार करण्यासाठी वेळ द्यावा आणि आर्थिक मदत करावी.’     

चेतन तुपे म्हणाले, ‘रुग्णांचा ताणतणाव कमी करताना डॉक्टरांनी स्वतःवरील ताणतणावही सांभाळावेत. रुग्णसेवेबद्दल डॉक्टरांना सलाम केला पाहिजे. डॉक्टरांवरील हल्ले करणारा समाज भानावर आणायची गरज आहे.’ 

जनरल प्रक्टिसशनर्स असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. संगीता खेनट, पिडी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोप पवार, यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. मधुसूदन झंवर, डॉ. राजेश पवार, डॉ. सिद्धार्थ जाधव, डॉ. अजित पाटील, डॉ. शिवदीप उंद्रे, डॉ. सुनील होनराव, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. परशुराम सूर्यवंशी, डॉ. प्रताप ठुबे, डॉ. प्रदीप उरसळ, डॉ. मुश्ताक तांबोळी, डॉ. नितीन पाटील, डॉ सुहास लोंढे, डॉ राजेंद्र जगताप, डॉ. गणेश निंबाळकर, डॉ. लालासाहेब गायकवाड, डॉ. सुलक्षणा जगताप उपस्थित होते.

या प्रसंगी ‘रस्त्यावरचा अपघात’ विषयावरील मूकनाट्य सादर करण्यात आले; तसेच ‘आबा की आयेगी बारात’ या विनोदी नाट्याचा आनंद डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लुटला. राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर्स सेल पुणे शहराध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. हेमंत तुसे यांनी मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search