Next
‘पारदर्शक कारभारासाठी महा-रेराचा वापर करा’
प्रेस रिलीज
Wednesday, June 20, 2018 | 04:31 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘बांधकाम व्यवसाय हा दुसऱ्या क्रमांकावरील व्यवसाय आहे जिथे सर्वात जास्त रोजगार उपलब्ध होतो. देशाच्या एकूण उत्पन्नात आठ ते नऊ टक्के वाट याच व्यवसायाचा आहे; परंतु ग्राहक आता खूप जागृत झाला आहे. त्यांच्याकडे पैसैही आहेत, पण फसवणूक होऊ नये याची त्यांना भीती असते. यासाठी विकसकांनी आपला संपूर्ण कारभार पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (RERA) कायद्याच्या नियमांचे पालन करावे,’ असे मत ‘महारेरा’चे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी व्यक्त केले.

विकसकांना ‘रेरा’ कायद्याच्या नियमांची माहिती व्हावी यासाठी क्रेडाई महराष्ट्रतर्फे क्रेडाई पुणे मेट्रोच्या ऑडीटोरियममध्ये कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी उपस्थित विकसकांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रभू बोलत होते. या वेळी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, क्रेडाई महाराष्ट्रा स्टेट अॅडव्हायझरी कौन्सिलचे अध्यक्ष सुहास मर्चंट, क्रेडाई महाराष्ट्र रेरा कमिटीचे संयोजक अखील अग्रवाल, आरती हरभजनका, ज्ञानेश्वर हाडतरे, रनजीत नाईकनवरे, एफ.डी. जाधव आणि मोठ्या संख्येने विकसक उपस्थित होते.

डॉ. प्रभू म्हणाले, ‘कायदे खूप येतात, पण त्याची अंमलबजावणी योग्य होत नाही. या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची यावर विचार करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत आपल्या प्रकल्पाची नोंदणी करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. सर्व सुविधा ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे. सर्व साधारणपणे नोंदणी (रजिस्ट्रेशन) झाले की आपले काम संपले असे होत नाही. यानंतर खरे काम सुरू होतो. ग्राहकांचा विश्वास वाढावा यासाठी विकासकांनी ‘रेरा’ नोंदणीचा लोगो वापरण्यास हरकत नाही. यामुळे आपल्या प्रकल्पाची संपूर्ण अधिकृत माहिती मिळेल आणि ‘रेरा’ लोगोमुळे त्यांचा विश्वासही आणखी वाढेल.’

‘नोंदणी केल्यानंतर प्रत्येक तीन महिन्यांना आपल्या प्रकल्पाचे पूर्ण झालेले काम, केलेल्या सुधारणा, ग्राहकांनी केलेल्या नोंदी आदी भरणे जरूरीचे आहे. यामुळे ग्राहकाला आपल्या प्रकल्पाची माहिती घरबसल्या मिळते. यातून ग्राहक आणि विकसक यांच्यामध्ये निर्माण होणारे गैरसमज दूर होतात. ग्राहकालाही संपूर्ण माहिती दिली असल्यामुळे तो तक्रार करू शकत नाही. त्यामुळे या कायद्याकडे दडपण म्हणून पाहू नये. यामुळे कोणालाही घाबरायची गरज नाही,’ असे डॉ. प्रभू यांनी नमूद केले.

आरती हरभंजनका यांनी ‘रेरा’ नोंदणी प्रक्रियेची संपूर्ण माहिती सादरीकरणाद्वारे सर्वांना करून दिली. ‘रेरा’ नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अचडणी कशाप्रकारे सोडवायच्या, अर्ज कसा भरायचा आदींची सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेमध्ये अनेक विकसकांनी मोकळेपणाने आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

कन्सिलेशनमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर  
ग्राहक आणि विकसक यांच्यामधील सलोखा वाढावा यासाठी या कन्सिलेशन फोरमची सुरूवात करण्यात आली आहे. याला पुण्यातील लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये दोघांच्याही सहमतीने तक्रारीचे निवारण केले जाते. कन्सिलेशनमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून करण्यात आले होते. क्रेडाई फेसबुक पेजवरून हे प्रक्षेपण करण्यात आले. या मुळे भंडारा, परभणी, चंद्रपूर, रत्नागिरी, मालवण, सावंतवाडी आदी ठिकाणच्या विकासकांनी याचा लाभ घेतला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search