Next
शहापूर तालुका कलाध्यापक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा
मिलिंद जाधव
Wednesday, October 10, 2018 | 12:13 PM
15 0 0
Share this storyशहापूर :
शहापूर तालुका कलाध्यापक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. वासिंद येथील सरस्वती विद्यालयात महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळाचे विभागीय सह-कार्यवाह विलास सेसाणे, ठाणे जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष दिगंबर बेंडाळे, सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य सुरेश सापळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली.

संघटनेच्या कामाचे कौतुक करून आणि शालेय स्तरावर आवश्यक सहकार्य वेळोवेळी दिले जाईल, याची ग्वाही देऊन प्राचार्य सापळे यांनी कलाध्यापक संघाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सभेत २०१८ ते २०२१ची तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. 

अध्यक्ष - नीलेश रोठे, उपाध्यक्ष - रवींद्र के. ठाकरे, उपाध्यक्ष - जयश्री जैन, सचिव - मारुती डी. कांबळे, सहसचिव - मनाली वागे, खजिनदार - राहुल ज्ञा. निक्ते यांच्यासह सुनील तारडे, संजय पानपाटील, दिलीप ठाकरे, सुनील सूर्यवंशी, दिनेश भोईर, शंभुराव सोनवणे, तुकाराम देठे, विलास पडवळ यांची सदस्य म्हणून आणि प्रा. सुरेश सापळे, प्रा. सीताराम चासकर, सुधीर थोरात, सुनील काठोळे यांची सल्लागार म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.तालुका संघाचे अध्यक्ष सुधीर थोरात यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या कामांचे श्रेय सर्व सदस्यांना देऊन कार्यकाळातील चढ-उताराचा लेखाजोखा मांडला. पुढे अधिक जोमाने काम करण्यासाठी आपण नवीन कार्यकारिणीच्या सोबत असू, अशी ग्वाही दिली.

नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा देताना बेंडाळे म्हणाले, ‘संघटनात्मक कार्यात जोमाने कार्यरत राहून संघटनावाढीसाठी प्रत्येक सदस्याने योगदान देणे आवश्यक आहे. शहापूर तालुक्याची सर्व टीम संघटनात्मक कामात सक्रिय सहभागी असून, मागील वर्षी झालेल्या जिल्हा संघाच्या कृतिसत्र कार्यक्रमावेळी याची प्रचिती आली आहे. जिल्ह्यातील सर्व कलाध्यापकांकडून आपणा सर्वांच्या कामाचे तोंड भरून कौतुक.’सभेचे अध्यक्ष व विभागीय सह-कार्यवाह सेसाणे सरांनी तालुका संघाच्या नवनवीन उपक्रमांचे कौतुक केले. संघटनात्मक कामात येणाऱ्या अडचणींवर मात करून जोमाने कार्य कसे करावे, यासंबंधी मार्गदर्शन केले. राज्य व जिल्हा प्रतिनिधींच्या निरीक्षणाखाली निवड झालेल्या कार्यकारिणीचे अभिनंदन करून तालुका संघाला शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link