Next
सचिनसारखे खेळण्याचा अनुभव देणारे अॅप सादर
प्रेस रिलीज
Wednesday, December 13 | 06:24 PM
15 0 0
Share this story

‘सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्स’  या मोबाईल गेमिंग अॅपचे उदघाटन जेट सिन्थेसिसचे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन क्रिस गोपालकृष्णन, जेट सिन्थेसिसचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष राजन नावानी आणि  सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झाले. मुंबई : सचिन तेंडुलकरसारखे खेळण्याचा आभासी अनुभव देणारे अनोखे  ‘सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्स’ हे मोबाईल गेमिंग अॅप जेट सिन्थेसिस या डिजिटल मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रात अग्रेसर असलेल्‌या  कंपनीने दाखल केले आहे. क्रिकेटची देवता असलेल्या सचिन तेंडुलकर यांचे स्वतःचे अधिकृत मोबाईल गेमिंग अॅप आहे. 

या अॅपच्या माध्यमातून सचिनची क्रिकेटिंग स्टाईल आणि काही नेत्रदीपक सामने प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. त्यांनी आपल्या देशासाठी खेळलेल्या काही अविस्मरणीय सामन्यांचा अनुभवही रसिकांना घेता येणार आहे.जेट सिन्थेसिसचे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन क्रिस गोपालकृष्णन आणि जेट सिन्थेसिसचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष राजन नावानी यांच्यासह सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते नुकतेच या  खेळाचे उद्घाटन करण्यात आले.

याबाबत बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाले, ‘सचिन सागाच्या माध्यमातून सर्व क्रिकेट प्रेमींना एकत्र आणून माझा क्रिकेटप्रवास त्यांना पुन्हा अनुभवता यावा, हे आमचे ध्येय आहे. सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्स हा खेळ स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक असतानाच, मजेशीरही आहे.कोणत्याही प्रकारचा फोन असलेल्या  प्रत्येक क्रिकेटवेड्या भारतीयाला हा खेळ खेळता यावा, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे, हा खेळ प्रत्येक मोबाईल डिव्हाईसला सहाय्यभूत ठरण्यासाठी टीमने खूपच मेहनत घेतली. माझा अनुभव आणि खेळाडूंचे कौशल्य यातून प्रत्येक क्रिकेटप्रेमीला डिजिटल विश्वातील क्रिकेटचा चॅम्पियन बनता येईल, अशी मला आशा आहे.’ 

जेट सिन्थेसिसचे व्यवस्थापकीय संचालक व उप-संचालक राजन नावानी म्हणाले, ‘देशभरातल्या असंख्य क्रिकेटप्रेमींनी या खेळासाठी नोंदणीपूर्व प्रतिसाद इतका उदंड दिला आहे, की त्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. मोबाईल गेमिंग खेळाडूंना सुपरस्टार क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचे नेत्रदीपक करीअर पुन्हा जगण्याची संधी मिळावी, हा आमचा या खेळामागचा हेतू आहे. आम्ही आमच्या या नव्या प्रकल्पाबद्दल खूप आशादायी आहोत. आभासी व्यासपिठावर क्रिकेटप्रेमींचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले आहेत, ते लोकांना आवडतील, अशी आम्हाला आशा आहे. ‘सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्स’ हा खेळ मोबाईल डिव्हाईसेसवर अतिभव्य आभासी क्रिकेटिंग अनुभव तयार करणार आहे. या खेळात वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे, खेळात कोणताही अडथळा येऊ न देता, खेळाडूला रिअल टाईम शॅडो आणि मोशनचा अनुभव येऊ शकणार आहे.

जेट सिन्थेसिसचे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन क्रिस गोपालकृष्णन म्हणाले, ‘क्रिकेट या खेळाचा अनुभव देशभरातील खेळाडूंना घेता यावा, यासाठी जेट सिन्थेसिसच्या आमच्या तंत्रज्ञ टीमने या जागतिक खेळासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. हा खेळ सामान्य खेळाडूंसाठी साक्षात सचिन तेंडुलकरसोबत प्रत्यक्षात येणार आहे. अधिकृत आणि अटीतटीच्या क्रिकेट अॅक्शनमधून सचिन आणि क्रिकेटच्या चाहत्यांना एकाच बंधात बांधून ठेवणारा ‘सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्स’ हा एकमेवद्वितीय खेळ आहे. लिटील मास्टरचा क्रिकेटिंग लहेजा आणि रिअलिस्टीक मोशन कॅप्चरच्या सहाय्याने या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या खेळाचा आनंद प्रत्येक भारतीयाला घेता येणार आहे. सचिनला क्रिकेटचा देव बनण्यासाठी ज्या आव्हानांना तोंड द्यावे लागले, ती सर्व आव्हाने या खेळाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयालाही अनुभवता येणार आहेत.हवेतून चेंडू झेलणार्या  किंवा सोडणार्यात फिल्डर्सप्रमाणेच स्विफ्ट मोशन क्वालिटी, स्टेडियमचे वातावरण आणि शॅडो मुव्हमेंट याचा आस्वाद या खेळातून लोकांना घेता येणार आहे. एका क्षणी तुम्ही अद्वितीय लेग स्पिनरला तोंड देता तर दुसर्यानच क्षणी तुम्ही रिव्हर्स स्विगिंग यॉर्करला सामोरे जाता. पिचमध्ये खेळताना प्रत्येक खेळाडूला खेळाचा उत्साह टिकवून ठेवता येईल, याची दक्षता या खेळाच्या डिझाईनमधून घेतली गेली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link