Next
डॉ. योगेश भालेराव यांना प्रतिष्ठित युएस फेलोशिप
प्रेस रिलीज
Tuesday, March 26, 2019 | 04:29 PM
15 0 0
Share this article:

पुणे : आळंदी येथील एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगचे (एमआयटीएओई) संचालक डॉ. योगेश भालेराव यांची युएस येथे होणार्‍या २०१९-२० फुलब्राइट नेहरू इंटरनॅशनल एज्युकेशन अ‍ॅडमिनिस्ट्रेटर्स सेमिनार (आयईएएस) या प्रतिष्ठित परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे.

डॉ. भालेराव हे ऑक्टोबर २०१९मध्ये होणार्‍या दोन आठवड्यांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. दर वर्षी संपूर्ण देशातून केवळ १२ इच्छुक व्यक्तींची या परिषदेसाठी निवड केली जाते. ‘आयईएएस’द्वारे भारतातील महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या प्रशासकांना युएसमधील उच्च शिक्षणपद्धती जाणून घेण्याची संधी उपलब्ध करण्यात येते.

या परिषदेदरम्यान डॉ. भालेराव यांना युएसमधील उच्च शिक्षणपद्धतीचे विविध पैलू संस्थांचे प्रकार, मान्यता, अभ्यासक्रम विकास, निधी उभारणी, विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि युएस कॅम्पसमधील आंतरराष्ट्रीय शिक्षण याबाबत माहिती प्राप्त होईल; तसेच तेथील शिक्षणतज्ञांना भारतीय उच्च शिक्षणाबद्दलची माहिती देता येईल. याबरोबरच सहयोग वाढवून संशोधन संस्था अधिक बळकट करणे, फॅकल्टी व स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम अधिक सुलभ करणे आणि जागतिक ज्ञान अधिक वाढविणे हे डॉ. भालेराव यांचे ध्येय असणार आहे.

या परिषदेद्वारे डॉ. भालेराव यांना एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगमध्ये इंटरनॅशनल प्रोग्राम डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंटला चालना देण्यास मदत होईल. या परिषदेत प्राप्त झालेल्या माहिती व ज्ञानाद्वारे संस्थेचा जागतिक स्तरावरील विकास, आंतरराष्ट्रीय सहयोग आणि एक्सचेंज प्रोग्राम व नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाची रचना यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या क्षमतेत वाढ करण्यास मदत करता येईल.

२०१९-२०२० फुलब्राइट नेहरू इंटरनॅशनल एज्युकेशन अ‍ॅडमिनिस्ट्रेटर्स सेमिनारसह डॉ. योगेश भालेराव हे मागील वर्षी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅंड टेक्नोलॉजी (एफआयईटी), फेलो ऑफ दी हायर एज्युकेशन अ‍ॅकॅडमी (एफएचईए), युनायटेड किंग्डम आणि इन्स्टिट्यूशन ऑफ मेकॅनिकल इंजिनीअर्स यासाठीदेखील त्यांची निवड झाली होती.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search