Next
अभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान
BOI
Monday, March 18, 2019 | 10:38 AM
15 0 0
Share this article:

खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना अभिजित दिघावकर

पुणे :
यंदाचा (२०१९) यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार नाशिक येथील अभिजित दिघावकर यांना नुकताच पुण्यात प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ गेल्या २० वर्षांपासून मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत हा पुरस्कार दिला जातो. 

प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिघावकर यांना नुकताच देण्यात आला. धनकवडीतील लोकनेते ना. शरदचंद्रजी पवार भवन येथे हा सोहळा झाला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि २१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

अभिजित दिघावकर यांनी युवक विकास, शिक्षण, पर्यावरण या क्षेत्रात काम केले आहे. ग्रामीण भागातील युवक-युवतींना त्यांनी वेळोवेळी विविध विषयांवर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत त्यांनी २०१८मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ते सध्या संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय युवक समितीचे भारतातील एकमेव जागतिक युवा राजदूत आहेत.

सुप्रिया सुळे यांनी दिघावकर यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांना आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पुरस्कार वितरण सोहळ्याला पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे आणि दत्ता धनकवडे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विश्वास ठाकूर, नीलेश राऊत, पुण्याचे नगरसेवक विशाल तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search