Next
रस्ते नियमन नियमावली जागृती कार्यशाळा
प्रेस रिलीज
Monday, March 12, 2018 | 04:48 PM
15 0 0
Share this story

पुणे : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार ‘इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रॅफिक एज्युकेशन’ने (आयआरटीई) गुडइयर इंडिया लिमिटेडच्या सीएसआर उपक्रम सहकार्याने ‘रस्ते नियमन नियमावली जागृती’संदर्भात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.

 ‘आयआरटीई’चे अध्यक्ष व ‘कॉलेज ऑफ ट्रॅफिक मॅनेजमेंट’चे संचालक डॉ. रोहित बालुजा यांनी संचलित केलेल्या या कार्यशाळेत महाराष्ट्र वाहतूक विभागाचे २५० हून अधिक अधिकारी सहभागी झाले. कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्राचे वाहतूक सहआयुक्त प्रसाद महाजन यांच्या हस्ते झाले. प्रादेशिक परिवहन अधिकारी जे. बी. पाटील, बी. आय. अजरी, लक्ष्मण दराडे व आर. टी. गिते या वेळी  उपस्थित होते.
 
या वेळी बोलताना ‘आयआरटीई’चे अध्यक्ष व ‘कॉलेज ऑफ ट्रॅफिक मॅनेजमेंट’चे संचालक डॉ. रोहित बालुजा म्हणाले, ‘रस्ते नियमनाची नियमावली रस्ते वापराची शिस्त, सुरक्षितता व कार्यक्षमतेचा पाया असते. वाहतूक विभाग, वाहतूक पोलिस आणि संबंधित राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील रस्ते वापरणाऱ्यांकडून रस्ते नियमन नियमावलीची योग्य माहिती घेऊन अंमलबजावणी होईल तेव्हाच रस्ते सुरक्षा सुधारण्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.
 
मंत्रालयाने रस्ते नियमन नियमावली १९८९ मधील दुरुस्ती करुन ती मोटर वाहन (चालन) नियमन २०१७ नियमावली या नावाने याआधीच राजपत्र अधिसूचना ६३४ई अन्वये अधिकृत अधिष्ठान दिले आहे. गेल्या २३ जून २०१७ पासून या नव्या नियमावलीने पूर्वीच्या रस्ते नियमन नियमावली १९८९ ची जागा घेतली आहे. या बदलाबाबत सर्व जबाबदार घटकांना माहिती देण्याची तातडीने गरज आहे. वाहन चालनाच्या नव्या नियमावलीचा मसुदा तयार करण्याबाबत रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला मदत करण्यात डॉ. बालुजा मोलाची भूमिका बजावत आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link