Next
‘सिंहगड इन्स्टिट्यूट’मध्ये सुमारे अडीच हजार प्लेसमेंट्स
प्रेस रिलीज
Tuesday, July 09, 2019 | 03:20 PM
15 0 0
Share this article:

कॅॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर

पुणे : येथील ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’मध्ये आतापर्यंत झालेल्या  कॅम्पस प्लेसमेंटमधून जवळपास दोन हजार ४६८  विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. 

‘सिंहगड इन्स्टिट्यूट’मध्ये प्लेसमेंट उपक्रम सतत सुरू असतात. या प्लेसमेंटसाठी आजपर्यंत १६२ कंपन्यांनी सहभाग नोंदविला आहे. यात टीसीएस, इन्फोसिस, कॉग्निझंट, विप्रो, महिंद्रा, सिंटेल, बिर्ला सॉफ्ट, जारो, बायजुज व अॅटलास कॅपको या कंपन्यांचा समावेश आहे. आजपर्यंत मिळालेल्या नोकऱ्यांपैकी सर्वाधिक वार्षिक पॅकेज ३३.२ लाखांचे जेटीपी जपान या कंपनीचे असून, सरासरी पॅकेज साडेतीन लाख प्रतिवर्ष असे आहे. प्लेसमेंट झालेल्या दोन हजार ४६८ विद्यार्थ्यांपैकी एक हजार ३३३ मुलांना अॅक्सेंचर (७७५), इन्फोसिस (२८९), कॉग्निझंट (२६९) या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत आणि त्यांचे वार्षिक पॅकेज साडेतीन ते साडेचार लाख एवढे आहे.

सिंहगड संस्थेचे ‘इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन’ प्रभावी असून, स्टुडंट ट्रेनिंग प्रोग्रामअंतर्गत विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यात सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्हूज, अॅप्टिट्यूड टेस्ट यांचा समावेश आहे. शैक्षणिक व इंडस्ट्रीजचा यामध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी ट्रेनिंग प्लेसमेंट डीन प्रा. जे. एन. पितांबरे, लोणावळा कॅम्पसचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. योगेश जाधव यांचा मोठा वाटा आहे.

‘सिंहगड’चे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या खूप उत्कृष्ट असल्याचे आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी नमूद केले आहे, असे सिंहगड वडगाव कॅम्पसचे संचालक डॉ. अरविंद देशपांडे यांनी सांगितले.  

‘विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात सिंहगड संस्था कुठेही कमी नाही हे वाढणारी प्लेसमेंटची संख्या दर्शवते. हे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे चालत राहणार आहे. कॅम्पस कनेक्टच्या विस्तृत धोरणामुळे ‘सिंहगड’च्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्याची संख्याही वाढत जाणारी आहे. कॅम्पस कनेक्टच्या धोरणाखाली कॉग्निझंट इनोव्हेशन चॅलेंज, टीसीएस कॅम्पस कम्युनिकेशन वेबिनार, ट्रेनिंग प्रोग्राम असे वेगवेगळे कार्यक्रम सिंहगड संस्था घेत आहे. याच धोरणामुळे विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी मदत होत आहे,’ असे ट्रेनिंग प्लेसमेंट डीन प्रा. पितांबरे यांनी नमूद केले. 

सिंहगड संस्थेच्या वाटचालीवर संस्थेचे उपाध्यक्ष रोहित नवले यांनी समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांचे व सर्व संबंधितांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search