Next
रोपळे येथील पाटील विद्यालयाचा कला शाखेचा निकाल १०० टक्के
BOI
Friday, June 01 | 09:09 AM
15 0 0
Share this story

सोलापूर : बारावीच्या परीक्षेत रोपळे (ता. पंढरपूर) येथील पाटील विद्यालयाच्या कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला, तर विज्ञान शाखेचा निकाल ९८.७५ टक्के लागला. कला व विज्ञान शाखेत या वेळीही मुलींनीच बाजी मारली असून, या दोन्ही शाखांतील दुसऱ्या क्रमांकावर मुलांनी प्रथमच मोहर उमटवली आहे.

कला शाखेत संगीता संजय साखरे या विद्यार्थिनीने ७५.६९ टक्के गुण मिळवून वर्गात प्रथम येण्याचा मान मिळवला. अनिकेत दिलीप वाघमारे या विद्यार्थ्याने ७४.४६ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर मयुरी आबा हराळे या विद्यार्थिनीने ७४.३० टक्के गुण मिळवून तिसरा नंबर पटकावला. विज्ञान शाखेत सुप्रिया पांडुरंग आढवळकर या विद्यार्थिनीने ८१.०७ टक्के गुण मिळवून वर्गात प्रथम, धनाजी सज्जन भोसले या विद्यार्थ्याने ७६.३० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर संचिता हनुमंत कदम या विद्यार्थिनीने ७६ टक्के गुण मिळवून तिसरा नंबर पटकावला. कला व विज्ञान शाखेत अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांकावर मुलींनीच बाजी मारली आहे. या दोन्ही शाखांत दुसऱ्या क्रमांकावर यंदा मुलांनी मोहर उमटवली आहे.

पुणे नगर भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक शिवाजी भोसले, सरपंच दिनकर कदम, रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य शिवाजी पाटील, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विलास भोसले, माजी पंचायत समिती सदस्य महेश कदम, रोपळे विकास प्रतिष्ठानचे संचालक अर्जुन भोसले, मुख्याध्यापक एस. एम. बागल, माजी मुख्याध्यापक एम. जे. चौधरी, पर्यवेक्षक टी. बी. ताटे, श्री दत्त इरिगेशन सिस्टीमचे संचालक दत्तात्रय भोसले आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link