Next
‘टाटा सॉल्ट’ने वारकऱ्यांना दिली ‘सॉल्ट-वॉटर फूट थेरपी’
प्रेस रिलीज
Saturday, July 21, 2018 | 02:52 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘टाटा सॉल्ट’ने पंढरपूरला चालत जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांना ‘सॉल्ट-वॉटर फूट थेरपी’ देऊ केली आहे. मुसळधार पावसासह सर्व नैसर्गिक परिस्थितींवर मात करत ७०० वर्षांच्या पारंपरिक वारीतून पायी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या वेदना कमी करण्यासाठी ‘टाटा सॉल्ट’ने विशेष फूट एड स्टेशन्स वारीच्या अनेक थांब्यांवर स्थापन केली आहेत.
 
वारकरी सरासरी ४० ते ५० किलोमीटर अंतर दररोज चालतात आणि त्यातील बहुतेकजण हे महाराष्ट्र व कर्नाटकाच्या दुर्गम भागातून आलेले वयस्कर लोकांचा समावेश आहे. या वारकऱ्यांना त्यांचे थकलेले पाय टाटा मीठ घातलेल्या गरम पाण्यात बुडवून विश्रांती घेता येईल यासाठी ही फूट एड स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. या मुळे ताठर झालेल्या स्नायूंचा रक्तपुरवठा उत्तेजित होण्यास, तसेच आखडलेले सांधे मोकळे होण्यास मदत मिळाली. मिठाचा उपयोग केवळ अन्नाला चव आणणारा घटक म्हणून न करता त्याचा असाही उपयोग करण्याची जुनी परंपराही यामुळे जिवंत झाली आहे.

हजारो वारकऱ्यांच्या थकलेल्या पायांना विश्रांती देण्यासोबतच टाटा सॉल्ट वारकऱ्यांचे भोजन तयार करण्यासाठी मंडळांना ६०० किलो डाळी व १२५ किलो मीठ देऊन मदत करत आहे. पंढरपुरात एक लाखांहून अधिक भाविकांना टाटा मिठाची १०० ग्रॅमची नमुन्याची पाकिटेही वितरित करण्यात आली आहेत. १४ जुलै रोजी सुरू झालेला हा उपक्रम आठ दिवस सुरू राहणार असून, २२ जुलै रोजी याची समाप्ती होईल. २२ जुलैपासून पाच दिवसांचे एक शिबिर सुरू करण्यात येईल. अनेक आठवडे चालून दमलेल्या वारकऱ्यांना प्रवास पूर्ण झाल्यानंतर विश्रांती मिळेल याची काळजी हे शिबिर घेईल.

टाटा केमिकल्स लिमिटेडच्या ग्राहकोपयोगी उत्पादन विभागाचे मार्केटिंग प्रमुख सागर बोके म्हणाले, ‘लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आमच्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या भोवतालच्या समुदायांचे आयुष्य सुधारण्यासाठी त्यांच्यासोबत काम करणे. या लांबच्या पल्ल्याचा आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांच्या वेदना या उपक्रमामुळे कमी होतील. या भागातील सर्वांत मोठ्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक सोहळ्यामध्ये, जेथे लोक एकत्र येऊन त्यांची श्रद्धा साजरी करतात, त्यात हे आमचे छोटेसे योगदान. वेगवेगळ्या क्षेत्रातील भाविक आपल्या श्रद्धेसाठी शेकडो मैल चालत येतात. त्यांना आराम देण्यासाठी टाटा मिठाचा वापर हे आमच्या उत्पादनाचे मूल्यवर्धन आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search