Next
‘ईपेलेटर’ची ट्रॅव्हल बुकिंगसाठी क्रेडिट सेवा
प्रेस रिलीज
Monday, June 03, 2019 | 04:44 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : येथील फिनटेक कंपनी ‘ईपेलेटर’ने अग्रणी भारतीय ऑनलाइन ट्रॅव्हल इंजिन आणि मार्केटप्लेस ‘मेक माय ट्रीप’सह भागीदारी केली असून, ‘मेक माय ट्रीप’वर विमान, बस आणि ट्रेनची तिकीटे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ‘ईपेलेटर’ची ‘आता बुक करा, नंतर पेमेंट करा’ सेवा उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे ग्राहकांना पेमेंट न करता प्रवासाची बुकिंग करण्यास तिकीट खरेदीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीपर्यंत व्याज-मुक्त क्रेडिटचा लाभ घेता येईल.

ही नवीन सुविधा वापरण्यासाठी वापरकर्त्यांना एकदा ‘ईपेलेटर’वर नोंदणी करावी लागेल (आधी केलेली नसेल तर), ज्यामुळे ते क्रेडिट मर्यादा वापरू शकतील. वापरकर्त्यांना चेक-आउट प्रक्रियेदरम्यान त्यांचा बँक खाते/कार्ड तपशील टाइप करावा लागत नाही किंवा पेमेंटच्या इतर पद्धती वापरण्याची गरज भासत नसल्याने वापरकर्त्यांसाठी ‘ईपेलेटर’चा वापर अधिक सुविधाजनक, जलद आणि सहज बनतो. व्यवहार फक्त एका टॅपद्वारे पूर्ण होऊ शकतो; तसेच वापरकर्ते सोप्या आणि किमान ऑनलाइन टप्प्यांद्वारे पेमेंट करू शकतात.

या विषयी बोलताना ‘ईपेलेटर’चे सह-संस्थापक अक्षत सक्सेना म्हणाले, ‘आम्हाला भारतातील अग्रणी ट्रॅव्हल पोर्टल ‘मेक माय ट्रीप’सह भागीदारी करण्यास आनंद होत आहे. २०१६मध्ये स्थापना झाल्यापासून ‘ईपेलेटर’ने विमान, हॉटेल, ट्रेन आदी प्रवास माध्यमांत अतिशय मजबूत स्वीकार्यतेचा आनंद घेतला आहे. बुकिंग अनुभव जलद, सहज आणि सुविधाजनक बनवून आम्ही नवीन पिढीच्या प्रवाशांना सक्षम बनवले आहे. पुढील ५०० दशलक्ष भारतीय प्रवाशांना सामावून घेण्याच्या दिशेने हे सहयोग एक पाऊल आहे कारण यामध्ये ग्राहकांच्या सहज अनुभवाचा डाटा सायन्स व डिजिटल क्रेडिटच्या आधुनिकतेशी संगम होत आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search