Next
‘रुबी’तर्फे एनडीएमध्ये व्हर्च्युअल क्लिनिक सुरू
प्रेस रिलीज
Tuesday, January 15, 2019 | 03:36 PM
15 0 0
Share this article:

पुणे : रुबी हॉल क्लिनिकतर्फे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) कॅंपसमधील बिगर लष्करी अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी व्हर्च्युअल क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून या परिसरातील दहा हजारांहून अधिक रहिवाशांना सामान्य, सर्वसाधारण आजारांचे निदान तसेच, हॉस्पिटलच्या वैद्यकीय तज्ञांद्वारे सल्ला देण्यात येणार आहे.

रुबी हॉल क्लिनिकचे हे व्हर्च्युअल क्लिनिक देशात टेलिमेडिसिन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या टाटा कम्युनिकेशन्सच्या ग्लोहिल यांच्या सहकार्याने कार्यान्वित करण्यात आले आहे. पासवर्डच्या साहाय्याने या उपक्रमाची गोपनियता सांभाळली जाणार आहे आणि निदानाची माहिती ही कॅम्पसमधील सेंटरमधून टेलिमेडिसिन उपकरणे हाताळणार्‍या प्रॅक्टिशनर्सतर्फे सेंट्रल हबला पाठविली जातील.

या क्लिनिकच्या उद्घाटनप्रसंगी ‘एनडीए’चे व्हीएम कमांडंट एअर मार्शल मार्शल आय. पी. विपिन, रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट आणि वानवडी येथील रुबी हॉल क्लिनिकच्या मुख्य कामकाज अधिकारी डॉ. मनिषा करमरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना एअर मार्शल आय. पी. विपिन म्हणाले, ‘हा नवीन अनुभव आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी खूप उत्साही आहोत. कोणत्याही संस्थेसाठी कर्मचारी हा महत्त्वाचा घटक असतो आणि आम्ही आमच्या कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या गरजा पुरविण्यासाठी, अभिनव उपाय देण्यासाठी आम्ही नेहमीच कार्यरत असतो. व्हर्च्युअल क्लिनिक हे कर्मचार्‍यांच्या आरोग्यासाठी एक सकारात्मक बदल आहे आणि व्हर्च्युअल क्लिनिकचा लवकर अवलंब करणार्‍यांपैकी आम्ही एक आहोत, आम्हाला असा विश्‍वास आहे, की देशभरात पुढील काळात टेलिमेडिसिनचा विस्तार होईल. रुबी हॉल क्लिनिक हे त्यांच्या वैद्यकीय तज्ञांमुळे नावाजलेले आहे आणि या व्हर्च्युअल क्लिनिकसोबतच आम्हाला गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध होईल आणि आमचा असा विश्‍वास आहे, या अभूतपूर्व प्रवासाची ही एक सुरुवात आहे.’

रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले, ‘ग्राहक सेवेसंदर्भात जगातील संकल्पना वेगाने बदलत आहेत. उत्तम आणि जलद सेवा मिळावी, अशी रुग्णांची अपेक्षा वाढत आहे. अशा वेळी व्हर्च्युअल क्लिनिक हेच यावर उत्तर आहे. या सेवेचे फायदे अनेक असून, त्याचा सर्वांत मोठा आणि सहज लक्षात येईल असा फायदा म्हणजे सर्वोत्तम दर्जाचे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम दर्जाची रुग्णसेवा हे रुबी हॉल क्लिनिकचा पाया असून, याचा लाभ सर्वांना होईल. आमच्या तज्ञांचा दीर्घकालीन अनुभवाचा फायदा सर्वांपर्यंत पोहचविण्यास टेलिमेडिसिनमध्ये सामर्थ्य असून, याद्वारे आरोग्यसेवा पुरवठ्यामध्ये परिवर्तन होऊ शकते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search