Next
हस्तलिखित शास्त्रावरील चर्चासत्राचे मुंबई विद्यापीठात आयोजन
BOI
Tuesday, March 05, 2019 | 03:28 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘हस्तलिखित शास्त्र : आयाम आणि दिशा’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागात १८ व १९ फेब्रुवारी रोजी पार पडले. विभागप्रमुख डॉ. सुचित्रा ताजणे यांनी विभागाचे अहवालवाचन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉक्टर रवींद्रकुमार पांडा यांनी हस्तलिखित शास्त्रातील काही गोष्टींचा संशोधकांनी कसा विचार करावा, याबाबत आपले विचार मांडले. त्रिपाठी यांनी हस्तलिखित शास्त्राविषयीची आवश्यकता सुलभ शब्दांत वर्णन केली. जनमानसामध्ये हस्तलिखित शास्त्राविषयी असलेल्या अनास्थेबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

हस्तलिखित शास्त्रातील विविध विषयांचा सखोल अभ्यास करणाऱ्या पुणे, मुंबई, नाशिक, बडोदा, दिल्ली, अहमदाबाद येथील विविध अभ्यासकांनी विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाला हस्तलिखित शास्त्र, त्यातील विविध प्रकारचे आयाम आणि निरनिराळ्या वाटा यांची जाणीव करून दिली. ज्येष्ठ अभ्यासक सिद्धार्थ वाकणकर यांनी समारोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून केलेल्या भाषणामध्ये हस्तलिखित शास्त्राचे सर्वंकष विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. संस्कृत विभागात हस्तलिखित शास्त्र शिकविले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही पर्वणीच ठरली. भारतीय हस्तलिखितांचा खजिना टिकवून ठेवण्यासाठी अशा कार्यक्रमांची अतिशय आवश्यकता आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

दोन दिवसांच्या या राष्ट्रीय चर्चासत्राचे सूत्रसंचालन अनुक्रमे डॉ. शकुंतला गावंडे व डॉ. माधवी नरसाळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन संस्कृत विभागप्रमुख डॉ. सुचित्रा ताजणे यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search