Next
ऋतू हिरवे सण बरवे
BOI
Friday, July 20 | 10:05 AM
15 0 0
Share this story

भारत हा उत्सवप्रिय देश आहे. वर्षभर कोणते ना कोणते सण साजरे होत असतात; मात्र आपले सण-उत्सव हे निसर्गचक्राशी संबंधित आहेत. हाच आधार घेऊन डॉ. सुधीर निरगुडकर यांनी हे लेखन केले आहे. प्रारंभी त्यांनी दिनविशेषाची माहिती देऊन सोळा संस्कारांवर प्रकाश टाकला आहे. त्यांनतर मराठी बारा महिन्यांनुसार म्हणजे कालगणनेनुसार सणांची माहिती दिली आहे. प्रत्येक महिन्याचे स्वतंत्र प्रकरण असून, त्या त्या महिन्यात येणाऱ्या सणांची रंजक माहितीही दिली आहे.

उदा. श्रावण महिन्यातल्या नागपंचमीची माहिती देताना निरगुडकर यांनी सणाशी संबंधित दंतकथा सांगितल्या आहेत. त्रिपुरी पौर्णिमेचीही अशीच वेगळी माहिती मिळते. महाराष्ट्राबाहेर साजरे होणारे गंगा दशहरा किंवा ओणमसारख्या सणांचाही पुस्तकात समावेश आहे. वसंत पंचमी, महाशिवरात्र, तुकाराम बीज, दत्त पोर्णिमा अशा दिवसांची माहितीही दिली आहे.

प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस
पाने : २४०
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link