Next
झोपेची गुणवत्ता तपासणारे यंत्र विकसित
BOI
Monday, December 10, 2018 | 05:13 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील जैव-वैद्यकीय अभियंता राम पाझायन्नूर यांनी झोपेची गुणवत्ता अचुकपणे तपासणारे यंत्र विकसित केले आहे. यामधील ही पोर्टेबल किट वापरून तुम्ही तुमच्या घरातच एका रात्रीत ही तपासणी करू शकता.  

यापूर्वीही अनेक रुग्णालयांमध्ये झोपेची गुणवत्ता तपासणाऱ्या प्रयोगशाळा (लॅब) उपलब्ध होत्या, पण त्यातील बहुतांश प्रयोगशाळा अतिशय क्लीष्ट आणि त्रासदायी आहेत. राम पाझायन्नूर यांनी विकसित केलेल्या या स्नूझफीट किटमुळे ही प्रक्रिया अतिशय अचूक, सोपी आणि सहज झाली आहे.        

स्लिपटेस्ट करण्यासाठी यापूर्वी रुग्णाला एखादया रुग्णालयात  दाखल होऊन एक रात्र स्लिप टेस्ट लॅबमध्ये झोपावं लागत असे. त्यात रुग्णाच्या हात-पाय, डोक्यावर अनेक वायर लावण्यात येत असत. तसेच नाकातही पाईप घालून स्नोरिंग टेस्ट करण्यात येत असत. या सगळ्यांत रुग्णाला खूप त्रास  होत होता. रुग्णाच्या अंगावरील वायर्समुळे रुग्णाच्या स्लिपटेस्टचे निकालही बऱ्याचदा चुकीचे येत असत. मात्र नव्याने विकसित केलेली ही कीट पोर्टेबल आहे. यात फक्त एक  कापडी पट्टा देण्यात आला आहे. हा पट्टा आपल्या गादीखाली  ठेवून आणि अंगठ्याला एक यंत्र लावून घरच्या घरी झोपेची गुणवत्ता तपासली जाऊ शकते.

झोप नीट लागते आहे का? झोपेत तुम्ही घोरता का? झोपेत  तुम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा नीट होतो आहे का? झोपेत  तुमचा पल्स रेट सामान्य असतो का? अशी वेगेवेगळ्या प्रकराची अचूक माहिती तुम्हाला राम यांनी विकसित केलेल्या  स्नूझफीट किटमुळे मिळू  शकते. झोप पूर्ण होत नसेल, तर  तुम्हाला निद्रानाश, मधुमेह, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लिप  एपनिया, रेस्टलेस लेग सिंड्रोम, हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब, डोकेदुखी यांसारखे आजार होऊ शकतात. मात्र राम यांनी विकसित  केलेली किट अतिशय अचूक निष्कर्षं देणारी आहे.      

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link