Next
‘खो-खो’मध्ये रत्नागिरीचा राज्यात सहावा क्रमांक
कुमार-मुली अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत चमकदार कामगिरी
BOI
Monday, November 26, 2018 | 12:01 PM
15 0 0
Share this article:

मंचर येथे झालेल्या ४६ व्या कुमार-मुली अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलींच्या संघासोबत मान्यवर.

रत्नागिरी : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने पुणे खो-खो असोसिएशन संयोजित व आंबेगाव तालुका स्पोर्ट्स अॅकॅडमी आयोजित ४६ वी कुमार-मुली अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा मंचर (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे झाली. या स्पर्धेत रत्नागिरीच्या मुले आणि मुलींच्या संघाने चमकदार कामगिरी करत राज्यात सहावा क्रमांक पटकावला. मुलींच्या संघाने उपांत्यफेरीत चांगली लढत दिली. रत्नागिरीच्या संजना सनगले, कोमल सनगले, पल्लवी  सनगले यांच्या उत्कृष्ट खेळाने खो-खो रसिकांनी मने जिंकली.

मुलांच्या उपांत्यफेरीत पुणे विरूद्ध रत्नागिरी असा सामना रंगला. १८ विरूद्ध सात गुणांनी हा सामना पूर्ण झाला. रत्नागिरीच्या राज पवारने तीन, तर ऋतिक धुळपने दोन गडी बाद करत कडवी झुंज दिली. रत्नागिरीतून मुलांची टीम प्रथमच स्पर्धेत सहभागी झाली होती. पहिल्या सामन्यात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपले पाय रोवले.

मुलींच्या दुसऱ्या उपांत्यफेरीत अहमदनगर विरूद्ध रत्नागिरी असा सामना झाला. रत्नागिरीच्या कोमल सनगलेने चार बळी मिळवले. संजना सनगलेने दोन मिनिटे २० सेकंद, एक मिनिट १० सेकंद संरक्षण केले, तर पल्लवी सनगलेने एक मिनिट ३० सेकंद, दोन मिनिटे ३० असे संरक्षण करत जोरदार लढत दिली.

तत्पूर्वी मुलींमध्ये ‘ड’ गटातील रत्नागिरी विरुद्ध औरंगाबाद हा सामना अतिशय चुरशीचा ठरला. दोन्ही संघांनी १२-१२ गुणांचीं नोंद केली. हा समाना बरोबरीत सुटला. मध्यंतराला रत्नागिरी ७-४ अशी तीन गुणांची आघाडी घेतल्याने हा सामना औरंगाबादकडे झुकत असल्याचे चित्र दिसत होते. त्यानंतर सामन्याचे चित्र बदलत ८-५ अशी गुणांची नोंद करत सामना बरोबरीत सोडवला. रत्नागिरीच्या कोमल सनगलेने दोन मिनिटे, दोन मिनिटे ३० सेकंद संरक्षण करताना तीन बळी मिळविले. पल्लवी सनगलेने तीन मिनिटे २० सेकंद, एक मिनिट संरक्षण करतना एक बळी मिळवला. अक्षता गावडेने एक मिनिट ४० सेकंद संरक्षण करताना एक बळी मिळविला. दुसऱ्या बाजूनेही चांगली खेळी झाली. शेवटपर्यंत सामना रंगतदार झाला. हा तिढा सोडवण्यासाठी पुन्हा सामना खेळविण्यात आला. तोही अटीतटीचा झाला. सामन्याच्या मध्यतंराला एक गुणांची आघाडी रत्नागिरीकडे होती. अक्षता गावडे, पल्लवी सनगले, कोमल सनगले, संजना सनगले यांच्या खेळाच्या जोरावर डाव संपण्यापूर्वी १५ सेकंद अगोदर रत्नागिरीने विजय मिळवला.

खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस संदीप तावडे, राज्य प्रसिद्धी कमिटी सदस्य राजेश कळंबटे, राष्ट्रीय पंच पंकज चवंडे, क्रीडा शिक्षक विनोद मयेकर, समीर काब्दुले, रामराव राठोड, प्रसाद सावंत यांनी दोन्ही टीमचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search