Next
‘गुणवत्ता, सेवा व सचोटी ही यशस्वी उद्योगाची त्रिसूत्री’
‘भारी-भरारी’ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अरुणा भट यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Friday, January 11, 2019 | 05:41 PM
15 0 0
Share this article:

मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळातर्फे आयोजित भारी-भरारी महोत्सवाचे उद्घाटन करताना अरुणा भट, वैशाली गाडगीळ, धनंजय देशपांडे, श्रीपाद करमरकर, संजय जोशी, राहुल कुलकर्णी, माधव गोडबोले, प्रसाद पटवर्धन आदी.

पुणे : ‘कोणताही उद्योग करताना गुणवत्ता, ग्राहकाभिमुख सेवा आणि कामातील सचोटी महत्त्वाची असते. याच त्रिसूत्रीच्या जोरावर अनेक उद्योजकांनी यशाची शिखरे गाठल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. आजचा छोटा व्यावसायिक उद्याचा उद्योजक होणार असतो. अशा प्रकारच्या ‘एक्स्पो’मधून उद्योजकांना व्यवसाय वाढविण्यास मदत होते,’ असे मत ‘केप्र’ मसालेच्या संचालिका अरुणा भट यांनी व्यक्त केले.

मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ आयोजित तीन दिवसीय ‘भारी भरारी’ या फन-फूड महोत्सवाचे उद्घाटन अरुणा भट व ‘पीएनजी ग्रुप’च्या वैशाली गाडगीळ यांच्या हस्ते झाले. डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे सुरू झालेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी श्रीपाद करमरकर, पुणे मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय जोशी, सचिव प्रसाद पटवर्धन, विश्वस्त राहुल कुलकर्णी, माधव गोडबोले, धनंजय देशपांडे आदी उपस्थित होते.

सत्कार करताना डावीकडून धनंजय देशपांडे, अरुणा भट, वैशाली गाडगीळ, संजय जोशी, श्रीपाद करमरकर व इतर.

वैशाली गाडगीळ म्हणाल्या, ‘आपल्या उत्पादन आणि सेवेच्या गुणवत्तेवर व्यवसायाची दिशा अवलंबून असते. प्रत्येक ग्राहक जोडला जातो आणि त्यातून उद्योग उभा राहतो. त्यामुळे ग्राहकाशी प्रामाणिक राहणे आणि त्याला उत्तम सेवा देणे हेच उद्योगाला यशाकडे नेण्यास उपयुक्त ठरते. या प्रदर्शनात अनेक गृहिणी आपल्यातील व्यावसायिक पैलू उलगडत आहेत. नाविन्य आणि ग्राहकाशी सुसंवाद याचेही महत्त्व आपण लक्षात ठेवले पाहिजे.’

या महोत्सव १३ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी खुला असणार आहे. यामध्ये जवळपास २०० च्यावर स्टॉल्स असून, रोज संध्याकाळी चैताली माजगावकर भंडारी यांचा धम्माल हास्य व पपेट शो, तर मनीषा लताड आणि सहकाऱ्यांचा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम अनुभवता येणार आहे.

प्रदर्शन पाहताना धनंजय देशपांडे, श्रीपाद करमरकर, संजय जोशी, अरुणा भट, वैशाली गाडगीळ.

महाराष्ट्रभरातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, वधु-वर सूचक, फॅशन, फोटोग्राफी, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, लहानांसाठी खेळ, गृहिणींसाठी मेहंदी, टॅटू असे विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत. या महोत्सवात कोल्हापुरी मिसळ, कटवडा, नागपुरी वडाभात, पुडाची वडी, खान्देशी शेवभाजी, कोकणी बिरड्याची उसळ, काळ्या रस्याची उसळ, घावन, विविध प्रकारचे थालीपीठे, विविध प्रकारचे मोदक, गुळपोळी, पुरणपोळी, खवापोळी अशा असंख्य पदार्थांची चव पुणेकरांना चाखता येणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search