Next
‘टीव्हीएस’तर्फे ‘रेडियॉन’ सादर
प्रेस रिलीज
Saturday, September 01, 2018 | 11:06 AM
15 0 0
Share this article:

चेन्नई : टीव्हीएस मोटर कंपनीने ११० सीसीची ‘रेडियॉन’ ही नवीन मोटारसायकल बाजारात आणली आहे. मेटल बॉडी, मजबूतीसह स्टाइल आणि आराम अशी या मोटारसायकलची वैशिष्ट्ये आहेत. या सादरीकरणाने टीव्हीएस मोटर कंपनीच्या मोटरसायकल श्रेणीमध्ये वाढ होत असून, ग्राहकांच्या दृष्टीकोनातून नवीन निर्मितीवर भर देण्यात आला आहे.

या वेळी ‘टीव्हीएस’चे सह व्यवस्थापकिय संचालक सुदर्शन वेणू म्हणाले, ‘कित्येक वर्षांपासून टीव्हीएस मोटर कंपनीचे ध्येय हे गुणवत्ता आणि विश्वसनीयता हेच राहिले असून, कंपनीने आकर्षक आणि समकालीन अशी उत्पादने बाजारात सादर केली आहेत. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांसह टीव्हीएस रेडियॉन आमच्या मूल्यांसह दर्जेदार आणि टिकाऊ वाहनासह एक आकर्षक स्टाइलची देखील हमी देते. आम्हाला असा विश्वास आहे, की विवेकी पुरोगामी ग्राहक या उत्पादनाप्रती पसंती दर्शवतीलच पण त्याच्या मजबूतीसह आपलेसे देखील करतील.’

‘टीव्हीएस’चे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी के. एन. राधाकृष्णन म्हणाले, ‘आज आम्ही येथे टीव्हीएस रेडियॉन सादर करत आहोत, ज्यामध्ये विवेकी पुरोगामी ग्राहक आमचे लक्ष्य असेल. टीव्हीएस रेडियॉन ही दर्जेदार अशा वैशिष्ट्यांनी युक्त असून यात मजबूती, आराम आणि स्टाइल समाविष्ट आहे. तिच्या निर्मितीमध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. माझा असा विश्वास आहे की टीव्हीएस रेडियॉन ही अशा ग्राहकांना नक्कीच आवडेल, जे एका मजबूत, आरामदायी आणि टिकाऊ मोटरसायकलच्या शोधात आहेत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
MADANSING CHATARSING RAJARWAL About 135 Days ago
हि मोटारसायकल खराब रस्त्यावर चालवण्यासाठी आरामदायक आहे का? हि एक लिटर मध्ये किती किलोमीटर चालते
0
0

Select Language
Share Link
 
Search