Next
‘आयसीआयसीआय सिक्युरिटीज’चा इश्यू २२ मार्चपासून
प्रेस रिलीज
Tuesday, March 20, 2018 | 06:00 PM
15 0 0
Share this story

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेडच्या इश्यूबाबत माहिती देताना अनुपम गुहा, अभिषेक माथुर, संगीता पंचधारी व   अमनदीप सिधू

पुणे : ‘आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेडच्या   प्रत्येकी पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या सात कोटी ७२ लाख ४९ हजार ५०८ इक्विटी शेअर्सची गुरुवार, २२ मार्च ते २६ मार्चपर्यंत शेअर प्रीमिअमसह रोख पद्धतीने प्रारंभी समभाग विक्री करण्यात येणार आहे,’ अशी माहिती आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेडचे अनुपम गुहा यांनी दिली. या वेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अभिषेक माथुर, संगीता पंचधारी,  अमनदीप सिधू उपस्थित होते.  

‘या योजनेमध्ये आयसीआयसीआय बँक लिमिटेडतर्फे इक्विटी शेअर्सचा (‘प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर’) समावेश आहे त्यापैकी तीन कोटी आठ लाख ६२ हजार ४७५ पर्यंतचे इक्विटीशेअर्स आयसीआयसीआय बँकेच्या भागधारकांना शेअर प्रीमिअमसह रोख रकमेला खरेदी करण्यासाठी राखीव असतील. तर ऑफरमध्ये विक्रीनंतरच्या पेड-अप इक्विटी भागभांडवलाचा समावेश २३.९८ टक्के  व नेट ऑफरचा समावेश (‘आयसीआयसीआय बँकेच्या भागधारकांसाठी रिझर्व्हेशन पोर्शन’ वगळता ऑफर) २२.७८ टक्के  असेल.ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा पाचशे एकोणीस  रुपये ते पाचशे वीस रुपये निश्चित केला आहे. किमान बोलीचे प्रमाण २८ इक्विटी शेअर्स  आणि त्यानंतर अठ्ठावीसच्या पटीत असेल.ऑफर कालावधी सोमवार, २६ मार्च  रोजी बंद होणार आहे’, असेही गुहा यांनी सांगितले.  

‘डीएसपी मेरिल लिंच लिमिटेड, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सीएलएसए इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एडलविस फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड, आयआयएफएल होल्डिंग्स लिमिटेड व एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, आयसीआसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर (‘बीआरएलएम’ किंवा ‘लीड मॅनेजर्स’) आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड बीआरएलएम – मार्केटिंग म्हणून जबाबदारी पार पाडेल’, असेही गुहा यांनी स्पष्ट केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link