Next
‘होंडा’तर्फे ठाणे येथे ट्रॅफिक ट्रेनिंग पार्कचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Monday, September 03 | 04:43 PM
15 0 0
Share this story

ठाणे : रस्ते सुरक्षेबद्दल असलेली बांधिलकी आणखी बळकट करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (एचएमएसआय) ठाणे महापालिकेच्या सहयोगाने व महाराष्ट्र पोलिसांच्या पाठिंब्याने १३ व्या ट्रॅफिक-ट्रेनिंग पार्कचे नुकतेच उद्घाटन केले. हे पार्क ठाणे पश्चिम येथील व्ह्यू सोसायटीसमोर आहे.

‘होंडा’ने ड्रीम रायडिंग हा विशेष उपक्रमही सुरू केला आहे. आता १८ वर्षांवरील कोणत्याही स्त्रीला स्वतंत्रपणे गाडी चालवण्याचे स्वप्न साकार करता येणार आहे. या विशेष उपक्रमांतर्गत ‘होंडा’च्या महिला सेफ्टी इन्स्ट्रक्टरच्या विशेष गटातर्फे महिलांना केवळ चार तासांमध्ये स्वतंत्रपणे गाडी चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्कचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ‘होंडा मोटरसायकल’चे वरिष्ठ उपाध्यक्ष यादविंदर सिंग गुलेरिया आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

यानिमित्त बोलताना ‘होंडा मोटरसायकल’चे वरिष्ठ उपाध्यक्ष गुलेरिया म्हणाले, ‘होंडा सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देते व या बांधिलकीमार्फत आम्ही अंदाजे २१ लाख भारतीयांना रस्ते सुरक्षेचे महत्त्व याबद्दल धडे दिले आहेत. होंडा टू व्हीलर्सला जिल्ह्यामध्ये सुरक्षेविषयी जागृती करण्याचा उपक्रम अधिक सक्षम करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही ठाणे महापालिका यांचे आभारी आहोत. हा उपक्रम प्रौढ व युवा पिढी या दोन्हींवर भर देणार आहे. बालकांना लहान वयामध्ये जागरुक केल्यास, त्यांना समाजातील सेफ्टी चॅम्प्स बनवणे शक्य होईल. भारतातील रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी आम्ही टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे.’

तीन एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेल्या चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्कमध्ये ‘होंडा’ने विशेष प्रकारे तयार केलेल्या व सुरक्षित वातावरणाद्वारे प्रत्यक्षातील रायडिंग स्थितीची प्रतिकृती साकारली आहे. ‘होंडा’ येथे महिला व बालके यांसह सर्व वयोगटांमध्ये रस्ते सुरक्षाविषयक जागृती करणार आहे. त्यासाठी शास्त्रीय मोड्युलचा वापर केला जाणार असून, त्यामध्ये प्रत्यक्षातील ज्ञान (गाडी चालवण्याचा अनुभव) व पुस्तकी ज्ञान (गाडी चालवण्याचे योग्य पोश्चर, वाहतुकीच्या खुणा व रस्ताविषयक नियम) या दोन्हींचा समावेश असेल. विशेषत: महिलांसाठी ड्रीम रायडिंग उपक्रम ‘होंडा’ने सुरू केला आहे. गाडी चालवताना अत्यंत आरामदायीपणा व आत्मविश्वास देत, होंडा सेफ्टी इन्स्ट्रक्टर (महिला व पुरुष) रायडरना गाडी चालवण्याचे अचूक तंत्र शिकवणार आहेत.

शाळेतील मुलांमध्ये सुरक्षितपणे गाडी चालवण्याच्या सवयी रुजवण्यासाठी व त्यांना जागरुक करण्यासाठी ‘होंडा’च्या रस्ते सुरक्षा मोड्युलमध्ये पाच ते आठ वर्षे वयोगटातील बालकांसाठी सापशिडीसारखे मूलभूत उपक्रम समाविष्ट आहेत. नऊ ते १२ वर्षे वयोगटातील बालकांसाठी ‘होंडा’ने आयात केलेली सीआरएफ ५० मोटरसायकल समाविष्ट केली आहे. यामुळे या मुलांना प्रत्यक्षातील रायडिंगद्वारे सुरक्षितपणे गाडी चालवण्याची संकल्पना शिकता येईल.

युवकांसाठी सुरक्षितपणे गाडी चालवण्यासाठी थेअरी सेशन्सही घेतली जात आहेत. चिल्ड्रेन ट्रेनिंग पार्क या अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये ओपन एअर अम्फिथिएटर, ट्रॅफिक एज्युकेशन मिनिएचर्स, प्राथमिक बालकांसाठी तयार केलेले विशेष ट्रॅक, कौशल्य वाढवणारे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष बिटुमन ट्रॅक व बालके, सहभागींसाठी खास कॅफेटिरिया यांचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link