Next
शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापकांचा सत्कार
‘स्वरबहार’ कार्यक्रमाचे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, September 07, 2018 | 05:02 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकदिना निमित्त विविध शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्रच्या चतु:शृंगी शाखेचे प्रमुख व्यवस्थापक एस. पी. मुकिम यांच्या हस्ते मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मेधा कुलकर्णी होत्या.‘परांजपे विद्या मंदिर’ च्या मुख्याध्यापिका फिलोमिना गायकवाड यांनी मेधा कुलकर्णी यांचा सत्कार केला. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. 
 
या वेळी ‘स्वरबहार’ या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या हिंदी व मराठी गाण्यांचा हा कार्यक्रम मोहिका दामले, डॉ. देविका दामले यांनी सादर केला आणि शिक्षकांना गुरूदक्षिणा दिली. 

या कार्यक्रमात ‘अबीर गुलाल’ पासून ‘मला मदन भासे हा’, ‘चांदणे शिंपीत’ आदी लोकप्रिय मराठी नाट्यगीते, भावगीते सादर करण्यात आली. हिंदी चित्रपटातील ‘आपकी नजरोंने समझा’, ‘ना जिया लागे ना’, ‘अजीब दास्तां’, ‘जियो ले गयो’, ‘झुमका गिरा रे’ आदी अवीट गोडीच्या गीतांनी शिक्षक वर्गालाही ठेका धरायला लावला. ढोलकीच्या तालावर सादर केलेल्या लावण्याही सर्वांना भावल्या.

या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता, निर्मिती डॉ. गौरी दामले यांचे होते. मोहिका दामले, डॉ. देविका दामले यांना विशाल गंड्रतवार (तबला), मुकुंद जोशी (तालवाद्य) व मिहीर भडकमकर (सिंथेसायझर) यांनी साथ केली. डॉ. गौरी दामले यांनी सूत्र संचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search