Next
यंदाचा ‘कोथरूड भूषण’ पुरस्कार मेजर डॉ. विपुल पाटील यांना जाहीर
२४ ऑगस्ट रोजी होणार प्रदान सोहळा
BOI
Thursday, August 22, 2019 | 11:54 AM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’च्या वतीने दर वर्षी देण्यात येणारा कोथरूड भूषण पुरस्कार यंदा ब्लॅक कॅट कमांडो, स्क्वाड्रन कमांडर एनएसजी मेजर डॉ. विपुल पाटील यांना जाहीर झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवरील अनेक यशस्वी मोहिमांमध्ये सहभाग घेतलेले मेजर विपुल पाटील मूळचे कोथरूडचे आहेत. २४ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे, अशी माहिती ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’चे संस्थापक अॅड. राहुल म्हस्के आणि अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिली. 

हा कार्यक्रम कोथरूडमधील शिक्षकनगरमधील उत्सव मंगल कार्यलयाशेजारच्या खेळाच्या मैदानावर होणार आहे. ‘बढेकर ग्रुप’, ‘वेंकीज’ आणि ‘गोयल गंगा ग्रुप’ हे कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक आहेत. 

कला, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या कोथरूडमधील गुणवंतांना गेल्या सात वर्षांपासून ट्रस्टच्या वतीने ‘कोथरूड भूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्कारामुळे कलेच्या माध्यमातून उभारी घेणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते. 

मेजर डॉ. विपुल पाटील यांनी विद्यापीठात प्रथम येऊन सुवर्णपदक मिळविले असून, ते भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. एनडीए, एएफएमसी यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये ते प्रशिक्षक आहेत. जगातील सर्वांत उंच व खडतर युद्धक्षेत्र असलेल्या सियाचीनमध्येही त्यांनी कार्य केले आहे, अशी माहिती ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’चे संस्थापक अॅड. राहुल म्हस्के आणि अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिली.  

समाजात चांगले काही तरी करू इच्छिणाऱ्या, परिस्थितीशी झगडणाऱ्या कोथरूडमधील गुणवंत, कलावंतांना ट्रस्टतर्फे पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार ट्रस्टच्या दहीहंडी उत्सवादरम्यान नामवंत कलाकाराच्या हस्ते प्रदान करण्यात येतो. ‘कोथरूड भूषण पुरस्कार मिळणे म्हणजे करिअरमध्ये यशाची गुढी उभारण्यासारखे असते,’ अशी भावना आतापर्यंच्या पुरस्कारविजेत्यांनी व्यक्त केल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

२०१३मध्ये झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’मधील गायिका सायली पानसे यांना, २०१४मध्ये गिर्यारोहक आनंद माळी यांना, २०१५मध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, कलाकार प्रवीण तरडे, २०१६मध्ये मोटोक्रॉस बेस्ट रायडर ऋग्वेद बारगुजे, २०१७मध्ये गिरिप्रेमी किशोर धनकुडे यांना तर २०१८मध्ये कबड्डीपटू सागर खळदकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search