Next
बालवाडीसाठी राष्ट्रीय धोरण व नियामावली बनविण्याची शासनाकडे मागणी
‘अर्ली चाइल्डहूड असोसिएशन’चे आदित्य तापडिया यांची माहिती
प्रेस रिलीज
Friday, July 05, 2019 | 03:38 PM
15 0 0
Share this article:

‘एज्युफेस्ट २०१९’च्या उद्घाटनप्रसंगी (डावीकडून) हर्षिता शर्मा, आदित्य तापडिया, अंकिता संघवी, स्मिता अग्रवाल, शिल्पा सोळंकी, रूपश्री.

पुणे : ‘बालवाडीमध्ये शिकविणारे शिक्षक व सेविका प्रशिक्षित नसल्याने निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा म्हणून याविषयीचे राष्ट्रीय धोरण व नियमावली बनविण्याची मागणी ‘अर्ली चाइल्डहूड असोसिएशन’ (ईसीए) या संस्थेने शासनाकडे केली आहे,’ अशी माहिती ‘ईसीए’चे राष्ट्रीय कोर समिती सदस्य आदित्य तापडिया यांनी ‘एज्युफेस्ट २०१९’ या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दिली. 

लहान मुलांना दोन ते पाच वर्षे या अतिसंवेदनशील वयोगटात बालवाड्यांमध्ये पाठविले जाते. त्यामुळे तेथील शिक्षक व सेविकांना विशेष प्रशिक्षणाची गरज असते; परंतु अनेकदा ही महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित राहते. ही गरज ओळखून ‘ईसीए’ या संस्थेतर्फे लहान मुलांच्या शिक्षकांसाठी खास ‘एज्युफेस्ट २०१९’ या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्यानिमित्ताने आदित्य तापडिया यांनी या मागण्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.

‘एज्युफेस्ट’चे हे दुसरे वर्ष आहे. ईसीए पुणे क्षेत्राचे प्रमुख मसरत तवावाला, इन्सिया रहीम, हर्षिता शर्मा यांच्या पुढाकाराने पुण्यातील हा प्रशिक्षण कार्यक्रम होत आहे. ‘यशदा’ व ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर’ या दोन ठिकाणी ८० सत्रांमध्ये ७० हून अधिक वक्ते चार ते सहा जुलै या तीन दिवसांत मार्गदर्शन करणार आहेत. बालवाडीच्या शिक्षिका व सेविकांच्या प्रशिक्षणासाठी आयोजित या कार्यक्रमात सुमारे ५०० बालवाड्यांतून साधारण हजार शिक्षिका व सेविका सहभागी होणार आहेत. यात उच्चार, सामाजिक विकास, त्यांचा सहभाग, व्यक्तिमत्व विकास या सगळ्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आदित्य तापडिया‘ईसीए’ने माजी मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे बालवाडीसंदर्भात विविध मागण्या केल्या. या विषयी माहिती देताना तापडिया म्हणाले, ‘भारतातील ८० ते ७० टक्के बालवाडी शिक्षिका व सेविका प्रशिक्षित नाहीत. त्यांना प्रशिक्षण घेणे सक्तीचे असायला हवे. त्यांच्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जावी. शासनाने तीन ते सहा वयोगटातील मुलांकडे देशाच्या भविष्याचा पाया म्हणून अत्यंत गांभीर्याने बघायला हवे. बालवाड्यांचा सुरक्षेचा दर्जा उंचवण्यासाठी नियमावली असावी, या वयोगटात लेखन व वाचन शिकविणे बंद करावे, शिक्षिका व सेविकांची शैक्षणिक गुणवत्ता ठरवावी. त्यांचा पगार वाढवावा व ‘ईसीए’ दर्जा प्रमाणपत्र आवश्यक करावे, अशा मागण्या केल्या आहेत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search