Next
‘आयसीआयसीआय’ची ‘मनीटूइंडिया’ सुविधा
प्रेस रिलीज
Friday, April 06, 2018 | 03:54 PM
15 0 0
Share this story

मुंबई : आयसीआयसीआय बँक या एकत्रित मालमत्तेच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकेने अनिवासी भारतीयांसाठी (एनआरआय) व्हॉट्सअॅप व ई-मेल अशा सोशल मीडियाचा वापर करून भारतातील लाभार्थींना पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध केल्याचे जाहीर केले आहे.

‘सोशल पे’ असे नाव असलेली व कोणत्याही भारतीय बँकेने दिलेली ही पहिलीवहिली सेवा रेमिटन्स करण्यासाठी बँकेच्या ‘मनीटूइंडिया’ (एमटूआय) या अॅपवर आहे. या नव्या सेवेमुळे ‘एनआरआय’ना त्यांच्या मित्रांना व कुटुंबांना सण व वाढदिवस अशा विशेष कारणांनिमित्त पैसे पाठवण्याची सुविधा व सोय मिळणार आहे.

पैसे पाठवण्यासाठी ‘एमटूआय’ अॅपवरून सुरक्षित लिंक निर्माण करावी व त्यांच्या बँकेच्या तपशील देण्यासाठी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर किंवा ईमेलवर शेअर करावी. २४ तासांसाठी वैध असलेल्या या लिंकला पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीकडून चार आकडी कोडचे संरक्षण दिले जाते व हा कोड ती व्यक्ती पैसे स्वीकारणाऱ्या लाभार्थीला पाठवते. त्यानंतर लाभार्थी बँकेचा तपशील देण्यापूर्वी पासकोडची खातरजमा करतो. त्यानंतर ‘एमटूआय’ युजर पुन्हा खातरजमा करतो व संबंधित व्यवहार सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी अॅपवरील पेमेंट तपशील कन्फर्म करतो.

सोशल मीडियाद्वारे परदेशात रेमिटन्स करण्याची सुविधा देणाऱ्या जगभरातील मोजक्या बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक लिमिटेड समाविष्ट आहे व भारतातील अशी पहिलीच बँक आहे.

या सुविधेविषयी बोलताना ‘आयसीआयसीआय’चे कार्यकारी संचालक विजय चंडोक म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँक ही भारतातील रेमिटन्स क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी आहे. जगभर अधिकाधिक लोक सोशल मीडियाशी जोडले जात असल्याने, ‘सोशल पे’ या माध्यमाद्वारे निधी हस्तांतराची प्रक्रिया सुलभ होणार आहे व ग्राहकांनाही ते सोयीचे ठरणार आहे. आमच्या ‘मनीटूइंडिया’ रेमिटन्स अॅपच्या युजरना ते नियमित वापर करत असलेल्या सोशल मीडियाचा वापर करून वाढदिवस व सण अशा खास निमित्तांनी त्यांच्या मित्रांना व कुटुंबियांना पैसे पाठवणे शक्य होईल. या सुविधेमुळे, आयसीआयसीआय बँक परदेशातील सेग्मेंट-बिझनेस व ऑनलाइन निधी हस्तांतर या क्षेत्रातील आपले कौशल्य उपलब्ध करून देणार आहे.’

माहितीची सुरक्षितता व गोपनीयता यांची खबरदारी घेण्यासाठी बँकेच्या सुरक्षित चॅनेलचा वापर करून ‘मनीटूइंडिया’ अॅप आणि सोशल मीडिया यांच्यातील संवाद साधला जातो. या सुविधेमार्फत केल्या जाणाऱ्या कोणत्याही व्यवहारासाठी बँक व ‘एमटूआय’ युजर यांच्यामध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन केले जाते व यामुळे निधी हस्तांतर सुरक्षितपणे केले जाईल, याची दक्षता घेतली जाते.

‘मनीटूइंडिया’ रेमिटन्स सुविधेसाठी तंत्रज्ञानावर आधारित विविध सेवा सुरू केल्या जात असताना ही नवी सुविधा दाखल करण्यात आली आहे. बँकेने अलिकडेच विविध वैशिष्ट्ये असलेली नवी ‘एमटूआय’ वेबसाइट व मोबाइल अॅप दाखल केले. त्यातील व्हॉइस-बेस्ड इंटरनॅशनल रेमिटन्स सेवा यासह अनेक या क्षेत्रातील पहिलेवहिले आहेत.

भारतातील रेमिटन्स क्षेत्रात आयसीआयसीआय बँक प्रवर्तक व आघाडीची बँक आहे. ‘मनीटूइंडिया’ गेली १५ वर्षे देशात रेमिटन्स सेवा देत आहे आणि जगभरातील लक्षावधी ‘एनआरआय’ना पैसे पाठवण्याची सुविधा देत आहे. बँकेने झटपट व सुलभ ट्रान्स-बॉर्डर निधी हस्तांतर सेवा देण्यासाठी जगभरातील विविध करस्पाँडंट बँकांशी सहयोग केला आहे.

आयसीआयसीआय बँक चार हजार ८५६ शाखा, १३ हजार ७९२ एटीएम, फोन बँकिंग, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, फेसबुक व ट्विटरवरील बँकिंग आणि देशातील पहिली मोबाइलवरील डिजिटल बँक ‘पॉकेट्सबायआयसायसीआयबँक’ अशा मल्टि-चॅनल जाळ्यामार्फत ग्राहकांना सेवा देते.

आयसीआयसीआय बँकेविषयी :
आयसीआयसीआय बँक लि. ही एकत्रित संपत्तीच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. ३० सप्टेंबर २०१७पर्यंत बँकेची एकूण एकत्रित संपत्ती १५६.८ अब्ज डॉलर होती. आयसीआयसीआय बँकेच्या उपकंपन्यांमध्ये भारतातील आघाडीच्या खासगी विमा, संपत्ती व्यवस्थापन व सिक्युरिटीज ब्रोकरेज कंपन्यांचा समावेश आहे आणि देशातील सर्वात मोठ्या खासगी इक्विटी फर्मचा समावेश आहे. बँक भारतासह १७ देशांत कार्यरत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link