Next
शिवछत्रपती पुरस्कारांचे १७ फेब्रुवारीला वितरण
राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान
प्रेस रिलीज
Thursday, February 14, 2019 | 04:20 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत माहिती देताना क्रीडा मंत्री विनोद तावडे

मुंबई : ‘राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आलेले शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार १७ फेब्रुवारी २०१९ रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे,’ अशी माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिली.

सन २०१७-१८या वर्षांचे हे पुरस्कार देण्यात येणार असून खेळाडू, मार्गदर्शक, संघटक आदींना गौरवण्यात येणार आहे. मल्लखांबसाठी योगदान देणाऱ्या उदय देशपांडे यांना सन २०१७-१८ यावर्षीचा जीवगौरव पुरस्कार, तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते यांना जाहीर करण्यात आला आहे.

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार पुढील १५ जणांना जाहीर झाला आहे- अमेय शामसुंदर जोशी (जिम्नॅस्टिक्स), सागर श्रीनिवास कुलकर्णी (जिम्नॅस्टिक्स), गजानन पाटील, पुणे ॲथलेटिक्स, मृणालीनी वैभव औरंगाबादकर (बुद्धिबळ), संजय बबन माने (कुस्ती), डॉ. भूषण पोपटराव जाधव (तलवारबाजी), उमेश रमेशराव कुलकर्णी (तायक्वांदो), बाळकृष्ण मलप्पा भंडारी (तायक्वांदो), स्वप्नील सुनील धोपाडे (बुद्धीबळ), निखिल सुभाष कानेटकर (बॅडमिंटन), सत्यप्रकाश माताशरन तिवारी (बॅडमिंटन), दीपाली महेंद्र पाटील (सायकलिंग), पोपट महादेव पाटील (कबड्डी), राजेंद्र प्रल्हाद शेळके (रोईंग), डॉ. लक्ष्मीकांत माणिकराव खंडागळे (वॉटरपोलो) यांना जाहीर झाला असल्याची घोषणा तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते) म्हणून पुढीलप्रमाणे नावे घोषित करण्यात आली आले आहे. यामध्ये मुंबई विभागाचे अंकुर भिकाजी आहेर, पुणे विभागाचे महेश चंद्रकांत गादेकर, कोल्हापूर विभागाचे मुन्ना बंडू कुरणे, अमरावती विभागाचे डॉ. नितीन गणपतराव चवाळे, नाशिक विभागाचे संजय आनंदराव होळकर, लातूर विभागाचे जर्नादन एकनाथ गुपिले, नागपूर विभागाचे राजेंद्र शंकरराव भांडारकर यांचा समावेश आहे.

पुरस्काराच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली असून, शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी तीन लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, ब्लेझर असे देण्यात येईल, तर उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, ब्लेझर असे आहे.

शिवछत्रपती पुरस्कारांच्या निवडीत होणारे वाद टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणून योग्य त्या खेळाडू-संघटक-मार्गदर्शक यांची निवड केली असून, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यात असल्याचे क्रीडा मंत्री तावडे यांनी यांनी या वेळी सांगितले.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार निवड समितीमध्ये क्रीडा मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शालेय शिक्षण आयुक्त यांच्यासह पद्मश्री धनराज पिल्ले, पद्मश्री प्रभाकर वैद्य, अर्जुन पुरस्कारार्थी रचिता मिस्त्री, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी प्रदीप गंधे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रतिनिधी जय कवळी, पॅरा ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रतिनिधी राजाराम घाग, अर्जुन पुरस्कारार्थी श्रीरंग इनामदार यांचा समावेश होता. या सर्व सदस्यांनी पुरस्कारार्थीची निवड केल्याचे तावडे यांनी सांगितले.

(पुरस्कारप्राप्त खेळाडूंची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link