Next
दिव्यात रंगले महिला जनजागृती कविसंमेलन
मिलिंद जाधव
Saturday, March 23, 2019 | 11:24 AM
15 0 0
Share this article:



दिवा : येथील रामवेणू काव्यमंच, कल्याण येथील लाख मोलाच्या कविता काव्यमंच, भिवंडीतील माझी आई प्रतिष्ठान सामाजिक संस्था, बहुउद्देशीय मानवसेवा संस्था, भांडूप येथील विकास प्रबोधिनी संस्था, कवी कट्टा कल्याण-मुंबई व ठाणे येथील जेष्ठ पत्रकार चैतन्य सुखदेव सोनावणे फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कवी दिनानिमित्त २१ मार्च २०१९ रोजी महिला जनजागृती कविसंमेलनाचे आयोजन दिवा येथील एस. एम्. जी. विद्यामंदिर येथे करण्यात आले होते.

संमेलन अध्यक्षा कवयित्री सुरेखा गायकवाड, डॉ. यशोधरा वराळे, कवयित्री मनिषा मेश्राम, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

प्रास्ताविक करताना कवी मिलिंद जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत असल्याचे सांगितले. महिलांचे प्रबोधन व्हावे, तसेच आपले विचार कवितेच्या माध्यमातून मांडण्यासाठी महिला जनजागृती कविसंमेलन आयोजित केल्याचे ते म्हणाले.

संमेलनाध्यक्षा गायकवाड यांनी प्रत्येक महिलेने आपल्या डोळ्यासमोर जिजाऊ, सावित्री, रमाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचे आवाहन करत महिला आज उंच भरारी घेत स्वबळावर लढत असल्याचे नमूद केले.

या वेळी संमेलनध्यक्षा गायकवाड, जेष्ठ कवी-गायक, मास्टर राजरत्न राजगुरू, जेष्ठ कवी गायक, किरण सोनावणे, साहित्यिक विलास बसवंत, ॲड. श्रीकृष्ण टोबरे, विजयकुमार भोईर, जगदेव भटू, नवनाथ रणखांबे, मिलिंद जाधव, मनिषा मेश्राम, कवी दीप, ज्योती गोळे, संघरत्न घनघाव, मारुती कांबळे, नरेश जाधव, रवींद्र आडके, विनोद गायकवाड आदींनी स्त्री मुक्ती, स्त्री शक्ती, महिला जागर, जिजाऊ, सावित्री, रमाई यांच्या जीवनावर प्रबोधनात्मक स्वरचित कविता सादर केल्या.

सर्व सहभागी कवींना सातही संस्थाच्या अध्यक्षांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन कवयित्री ज्योती गोळे यांनी केले. आभार कवी रवींद्र आडके यांनी मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search