Next
‘वसई-विरार’ला शहरस्तर संघाचा द्वितीय राष्ट्रीय पुरस्कार
प्रेस रिलीज
Saturday, February 16, 2019 | 04:45 PM
15 0 0
Share this storyनवी दिल्ली : स्वच्छतेत उत्कृष्ट कार्य करण्यासाठी वसई-विरार महानगरपालिकेच्या आकांक्षा शहरस्तर संघाने देशात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला असून, राज्यातून याच महापालिकेच्या सक्षम आणि युगंधरा वसतीस्तर संघाने अनुक्रमे पहिला व दुसरा आणि मिराभाईंदर महापालिकेच्या मदर टेरेसा संघाला तिसरा पुरस्कार मिळाला आहे.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-शहरी उपजीविका कार्यक्रमांतर्गत देशभरातील महापालिका व नगरपालिकांतर्गत कार्यरत शहरस्तर व वस्तीस्तर संघाना १५ फेब्रुवारी २०१९ रोजी वर्ष २०१८-१९साठी स्वच्छता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गाप्रसाद मिश्रा आणि सह सचिव संजय कुमार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

वसई-विरार महापालिकेच्या आकांक्षा शहरस्तर संघाच्या स्वच्छता क्षेत्रातील कार्याची दखल घेत या संघास राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक प्रदान करण्यात आला. ‘वसई-विरार’चे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्यासह या संघाच्या अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आकांक्षा या शहरस्तर संघात १५ वस्तीस्तर संघांचा समावेश असून, कचऱ्याचे कंपोस्ट खत बनविणे, ओला व सुखा कचरा यांचे वर्गीकरण करणे, तसेच स्वच्छतागृहांबाबत जनजागृतीचे कार्य या संघाने केले. दोन लाख रूपये, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  

या कार्यक्रमात प्रत्येक राज्यातील सर्वोत्तम तीन वस्तीस्तर संघांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून वसई-विरार महापालिकेच्या सक्षम वस्तीस्तर संघाला प्रथम, तर याच महापालिकेच्या युगंधरा वस्तीस्तर संघाला द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. मीरा-भाईंदर महापालिकेच्या मदर टेरेसा वस्तीस्तर संघाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक वस्तीस्तर संघात २० महिला बचत गटांचा समावेश
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link