Next
ठाण्यात निघाली छोट्या वारकऱ्यांची दिंडी
प्रेस रिलीज
Tuesday, July 04, 2017 | 01:08 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : नऊवारी साडी परिधान करून, डोईवर छोटेसे तुळशी वृंदावन घेऊन आणि पांढऱ्या शुभ्र वेशात कपाळाला बुक्का लावून निघालेले छोटे वारकरी, त्यांच्या मुखातून दुमदुमणारा विठू माऊलीचा नामगजर.... निमित्त होते आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या बालवारीचे!
ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ‘ब्राह्मण विद्यालय, पूर्व प्राथमिक विद्यालया’मधील बालवारकऱ्यांनी दिंडी काढून, मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी केली. बालदिंडीचे प्रस्थान होण्यापूर्वी मुख्याध्यापिका रोहिणी दिवाण व त्यांच्या सहशिक्षकांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर पंढरीच्या वारीतील रिंगणाप्रमाणे बालवारकऱ्यांनीदेखील रिंगण तयार केल्याने, जणू काही बाल वारकऱ्यांचा जथ्था पंढरपूरच्या दिशेने माऊलींचा जयघोष करीत जात असल्याचे चित्र उपस्थितांच्या डोळ्यांसमोर उभे राहिले.
संस्थेचे चिटणीस श्री. केदार जोशी या वेळी उपस्थित होते.
ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या सर्व शाखांमध्ये विद्यार्थ्यांना सणांची माहिती होण्यासाठी  वर्षभरातील सर्व सणवार मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.



 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search