Next
‘टाटा पॉवर’ आणि ‘एचपीसीएल’मध्ये सामंजस्य करार
प्रेस रिलीज
Friday, September 28, 2018 | 04:06 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील सर्वांत मोठी एकात्मिक ऊर्जानिर्मिती कंपनी टाटा पॉवर आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) हा नवरत्न तेल आणि नैसर्गिक वायू सार्वजनिक उपक्रम या दोघांनी भारतभरातील ‘एचपीसीएल’ रिटेल आउटलेट्स आणि अन्य ठिकाणी व्यावसायिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स स्थापन करण्यासाठी सामंजस्य ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

या नवीन महत्त्वपूर्ण सामंजस्य कराराच्या माध्यमातून टाटा पॉवर आणि ‘एचपीसीएल’ यांच्यात भारतात अनुकूल ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांच्या (ई-कार्स, ई-ऑटोरिक्षा, ई-बाइक्स, ई-बसेस आदी) चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांचे नियोजन, विकास व कार्यान्वयन करण्यासाठी परस्पर सहकार्याबाबत सहमती झाली आहे. याशिवाय अपारंपरिक ऊर्जेसारख्या संबंधित क्षेत्रातील संधी ओळखून त्याबाबत सहकार्य करण्याचाही दोन्ही कंपन्यांचा विचार आहे.

टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, ‘एचपीसीएलसोबत झालेल्या भागीदारीची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा विस्तार पारंपरिक सीमांपलीकडे करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतभरातील या प्रस्तावित चार्जिंग स्टेशन्सद्वारे इलेक्ट्रिक वाहनांना सेवा देऊन टाटा पॉवर देशात ईव्हीजचा वापर वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि त्यायोगे भारताच्या पर्यावरणदृष्ट्या अधिक शाश्वत अशा भवितव्यासाठी केलेला वायदा पूर्ण करणार आहे.’

टाटा पॉवरच्या बिझनेस एक्सलन्स विभागातील नवीन व्यवसाय सेवांचे धोरणप्रमुख (चीफ-स्ट्रॅटेजी) राहुल शाह म्हणाले, ‘शाश्वत ऊर्जेसाठी आवश्यक बदलांचा प्रचार करण्यात टाटा पॉवर कायमच आघाडीवर राहिले आहे. मोक्याच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स स्थापन करून ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांतील आमचे योगदान सातत्याने वाढवत राहण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ‘एचपीसीएल’सोबत सहयोग झाल्यामुळे ईव्ही पायाभूत सुविधा राष्ट्रीय स्तरावर नेऊन आमच्या ग्राहकांना जागतिक दर्जाच्या सेवा देण्यात आम्हाला मदत होणार आहे.’

‘एचपीसीएल’च्या कॉर्पोरेट धोरण नियोजन आणि व्यवसाय विकास विभागाचे कार्यकारी संचालक रजनीश मेहता म्हणाले, ‘व्यवसाय वैविध्यपूर्ण करण्यावर आणि भविष्यकाळासाठी सज्ज राहण्यावर ‘एचपीसीएल’चा विश्वास आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करण्यातील प्रमुख अडथळा म्हणजे या वाहनांच्या आवाक्याबद्दल सतावणारी चिंता आणि देशभर चार्जिंगच्या पायाभूत सुविधा स्थापन झाल्यास या चिंतेचे निराकरण होईल. इलेक्ट्रिक वाहने बाजारपेठेत स्वीकारली जाण्यासाठी चार्जिंग स्टेशन्सचे दमदार नेटवर्क विकसित होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आम्हाला वाटते. दूरवर कनेक्टिविटीची हमी मिळाली, तर इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार व्यापकरित्या होऊ लागेल. टाटा पॉवरचा शाश्वत व पर्यावरणपूरक ऊर्जेवर, तसेच ऊर्जा मूल्य साखळीत व्यापक पद्धतीने पोहोचण्यावर भर आहे. अशा कंपनीसोबत ई-वाहतूक उपक्रमासाठी सहकार्य करण्याची उत्तम संधी ‘एचपीसीएल’सारख्या एकात्मिक तेल आणि वायू कंपनीला लाभली आहे. रिटेल आउटलेट्स आणि अन्य आस्थापनांच्या स्वरूपातील आमच्या व्यापक मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्कचा लाभ घेत देशभरात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स स्थापन करण्याची आमची योजना आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link