Next
अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी मुदतवाढ
प्रेस रिलीज
Saturday, August 12 | 06:43 PM
15 0 0
Share this story

बुधगाव (सांगली) : तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी नऊ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या नवीन प्रवेश सूचनेनुसार २०१७-१८ मध्ये अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख दि. ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. 

नवीन प्रवेश सूचनेनुसार जे विद्यार्थी संस्थास्तर व अगेन्स्ट कॅप जागांसाठी नोंदणी किंवा कागदपत्रे पडताळणी करू शकलेले नाहीत, तसेच १२ वी मध्ये अनुत्तीर्ण झाल्यामुळे पुनर्परीक्षेत  पास होऊन आता प्रवेशासाठी पात्र असणाऱ्यांना अभियांत्रिकी प्रवेशाची संधी मिळावी म्हणून ही मुदत वाढ देण्यात आली आहे. 

तरी जे विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र आहेत व संस्थास्तर व अगेन्स्ट कॅप कोठ्यामधून प्रवेश घेण्यासाठी इच्छूक आहेत, त्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, बुधगाव प्रशासनाने केले आहे. 

ऑनलाईन रजिस्ट्रेशन, कागदपत्र पडताळणी व प्रवेश अर्जासाठी : 
दिनांक : २४ ऑगस्ट 
वेळ : सायंकाळी पाच वाजेपूर्वी 

प्रवेशाची अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट 

अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रा. डॉ. ए. ए. पाटील : ७५८८६ २६८२५
प्रा. बी. एस. पाटील : ९५४५४ ५१४४१
प्रा. यु. यु. रानडे : ९८५०६ ३२९२०

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link