Next
‘पीबीएल’मध्ये सहभागी होणार ‘व्होडाफोन’चे ‘सुपर फॅन’
प्रेस रिलीज
Saturday, December 22, 2018 | 01:21 PM
15 0 0
Share this story

मुंबई : व्होडाफोन प्रीमिअर बॅडमिंटन लीग २२ डिसेंबरपासून सुरू होत असून, यानिमित्ताने या स्पर्धेत सामील होण्यसाठी व्होडाफोनने ग्राहकांसाठी आकर्षक संधी उपलब्ध केली आहे. व्होडाफोन सुपर फॅन म्हणून ग्राहकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

यंदाच्या बॅडमिंटन पर्वामध्ये व्होडाफोन सुपर फॅनना बॅडमिंटन खेळाडूंचा खेळ लाइव्ह पाहता येणार आहे असून, काही सुपर अनुभव घेता येणार आहेत. या सुपरफॅनना लक्झरी कारने मैदानात जाऊन व्हीआयपी बॉक्समधून सामना पाहता येणार आहे; तसेच शटल कॉकवर आवडत्या खेळाडूची स्वाक्षरीही घेता येणार आहे. व्होडाफोन सुपर फॅन होण्यासाठी व्होडाफोन ग्राहकांना केवळ एसएमएस करावा लागणार आहे. थर्ड पार्टी-एक्स्टर्नल पार्टी ऑडिटद्वारे विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

याबाबत बोलताना व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर शशी शंकर म्हणाले, ‘आमच्या ग्राहकांना आणि क्रीडाप्रेमींना सहभागी करून घेण्यासाठी क्रीडा उपक्रम ही मोठी संधी असते. भारतीय बॅडमिंटनची व चाहत्यांची संख्या वाढतच असल्याने ‘पीबीएल’बरोबरच्या आमच्या सहयोगामुळे आमचा हा विश्वास प्रबळ झाला आहे. व्होडाफोन प्रीमिअर बॅडमिंटन लीग २०१८मुळे आमच्या ग्राहकांना सहभागी होण्यासाठी व आकर्षक वस्तू जिंकण्यासाठी स्मार्टेस्ट मूव्ह दाखवण्याची संधी मिळणार आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link