Next
‘फ्लक्सर’ या मोबाईल गेमिंग मंचाची भारतात सुरुवात
प्रेस रिलीज
Thursday, July 12, 2018 | 02:36 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘लाईव्ह मी’ या उत्तर अमेरिकेच्या एका सोशल नेटवर्किंग अॅपने भारतातील गेमर्ससाठी एका नवीन मोबाइल गेमिंग आणि ई स्पोर्ट्स लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाइल मंच ‘फ्लक्सर’ची अधिकृत घोषणा केली आहे. 

दक्षिण-पूर्व आशियात गेमर्सचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी, नावीन्यपूर्ण यूझर-इंटेरॅक्टिव्ह वैशिष्ट्यांसह उत्कृष्ट दर्जाचे लाईव्ह स्ट्रीमिंग, उत्तम गेमिंग कंटेंट आणि एक परस्परसंवादी आणि इमर्सिव्ह गेमिंग कम्युनिटी देणे हे फ्लक्सरचे ध्येय आहे . या मंचावर यूझर्स पियूबीजी मोबाईल, फोर्टनाइट, रुल्स ऑफ सर्व्हायवल, अरीना ऑफ व्हेलोर, लीग ऑफ लेजण्ड्स,माइनक्राफ्ट, सीएसजिओ, जीटीए फ़ाईव्ह , डिओटी टू, कॉल ऑन ड्यूटी, क्लॅश रोयाल आणि अशा इतर अनेक लोकप्रिय गेम्सचे लाईव्ह प्रसारण पाहू शकतात. 

लाईव्हमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व चीता मोबाइलचे वरिष्ठ उपाध्यक्ष युकी म्हणाले, ‘मोबाइल गेम्स आणि व्यवसायिक ई-स्पोर्ट्स मार्केटमध्ये आशिया हे अजून नवे आणि खूप शक्यता असलेले अमर्याद मार्केट आहे. स्थानिक शासनाचा या क्षेत्रातील पाठिंबा आमच्या कल्पनेपेक्षादेखील चांगला आहे. या झपाट्याने वाढत असलेल्या बाजारपेठेने मला त्या काळाची आठवण दिली, ज्यावेळी चीनमध्ये इंडियन आयडॉल-स्पोर्टची सुरुवात झाली होती. लाईव्हमीचा अनुभव आणि संसाधनांचा उपयोग करून गेम प्रकाशक आणि प्रेक्षक यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी या मार्केटच्या विकासात आम्ही महत्त्वाचे घटक ठरू अशी आम्हाला आशा आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link