Next
‘समाजोपयोगी संशोधनावर भर द्यावा’
प्रेस रिलीज
Monday, March 05 | 03:47 PM
15 0 0
Share this story

डॉ. एम. कटककर संशोधन केंद्राचे उद्घाटन करताना डावीकडून सुभाष जिरगे, डॉ. एम. कटककर, सुनील रेडेकर व अशोक सराफ.

पुणे :
‘शहराची वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहने यामुळे प्रदुषणाची समस्या गंभीर होत आहे. यावर उपाय करण्यासाठी बॅटरीवर चालणारी वाहने विकसित व्हायला हवीत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधन करावे. आपल्या संशोधनाचा फायदा समाजाच्या उपयोगाला आला पाहिजे, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे,’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे जेष्ठ विश्वस्त अशोक सराफ यांनी व्यक्त केले.

डॉ. एम. कटककर यांनी दिलेल्या आर्थिक सहाय्यातून पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या ‘डॉ. एम. कटककर संशोधन केंद्रा’चे उद्घाटन सराफ यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी देणगीदार डॉ. एम. कटककर, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुभाष जिरगे, कुलसचिव सुनील रेडेकर, ज्येष्ठ संचालक हणमंत भोसले, संचालक कृष्णाजी कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, प्रा. राजेंद्र कडुसकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या संशोधन केंद्रात विद्युत वाहन, स्मार्ट सिटी, मेट्रो विकास यासारख्या विषयांवर संशोधन होणार आहे.

‘तंत्रज्ञानाचा विकासा’वर मार्गदर्शन करताना सराफ म्हणाले, ‘शहरातील रिक्षांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. त्यांना बॅटरीवर आणता येईल का, याचा विचार व्हावा. तसे झाल्यास प्रदूषण थांबेलच; पण इंधनाचीही मोठी बचत होईल. कचरा समस्या, वाहतूक व्यवस्था, आरोग्य, अन्न व इतर सोयी आणि शेतीसाठी उपयुक्त संशोधन अशा संशोधन केंद्रामधून व्हायला हवे. शिक्षणसंस्थांकडून मिळत असणारे हे प्रोत्साहन सकारात्मक आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link