Next
फोर्ड इंडियाचा दहा लाख ग्राहकांचा टप्पा पार
प्रेस रिलीज
Wednesday, July 18, 2018 | 02:38 PM
15 0 0
Share this story

फोर्ड इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा यांनी कंपनीचे दहा लाखावे भारतीय ग्राहक नवी दिल्लीचे निखिल कक्कर आणि अलेक्झांड्रा कक्कर यांना फोर्ड फ्रीस्टाइल मोटार प्रदान केली.

नवी दिल्ली  : फोर्ड इंडिया या आघाडीच्या प्रवासी वाहन उत्पादक कंपनीने भारतात दहा लाख ग्राहकांचा टप्पा पार केला आहे. एका विशेष समारंभात फोर्ड इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा यांनी नवी दिल्लीच्या निखिल कक्कर यांचे कंपनीचे १० लाखावे भारतीय ग्राहक म्हणून स्वागत केले आणि फोर्ड फ्रीस्टाइल  मोटार त्यांना प्रदान केली.

‘भारतात दहा लाख ग्राहकांचा टप्पा ओलांडताना आम्हाला अभिमान वाटत आहे. आमच्या ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वास आणि भरवशाबद्दल आम्ही त्यांचे कायम ऋणी राहू’, अशी भावना  अनुराग मेहरोत्रा यांनी व्यक्त या वेळी केली. ‘भारतात चार स्तंभांवर- मजबूत ब्रॅण्ड, योग्य उत्पादने, स्पर्धात्मक खर्च आणि प्रभावी प्रमाण- अविरत भर देत आम्ही यापुढेही अन्य उद्योगांच्या तुलनेत अधिक वेगाने वाढ साधत राहू आणि फोर्ड परिवारात अधिकाधिक सदस्य आणत राहू’,असेही मेहरोत्रा यांनी सांगितले.

फोर्डने भारतात १९९८ पासून दोन अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या वाहन बाजारपेठांपैकी एक असलेल्या बाजारपेठेत एक शाश्वत, लाभदायी उद्योग उभा करण्यासाठी फोर्ड वचनबद्ध आहे. सुरक्षितता आणि दर्जा यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या फोर्डने आपल्या सर्वाधिक प्रसिद्ध आयकन, एण्डेव्हर, फिएस्टा, फिगो आणि इकोस्पोर्ट या गाड्या भारतात आणल्या आहेत.भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. फोर्डच्या उत्पादनश्रेणीमध्ये आज प्रत्येक ग्राहकाच्या गरजांना अनुकूल असलेल्या गाड्या आहेत. अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरील फिगो आणि अॅस्पायरसारख्या हॅचबॅक आणि सेदानमधील गाड्यांपासून ते फ्रीस्टाइलसारखी सीयूव्ही आणि इकोस्पोर्ट आणि एण्डेव्हरसारख्या एसयूव्हीजपर्यंत सर्व गाड्या या श्रेणीत आहेत. फोर्डच्या भारतातील उत्पादनश्रेणीत वैशिष्ट्यपूर्ण मुस्टँग या जगातील सर्वाधिक विक्रीच्या गाडीचाही समावेश आहे. या नवीन उत्पादनांच्या जोडीनेच फोर्डने आपल्या डीलर्सच्या राष्ट्रव्यापी जाळ्याचा सातत्याने विस्तार करत; तसेच जागतिक दर्जाच्या विक्रीउत्तर सेवा देत ग्राहकांशी असलेले संबंध अधिक दृढ करणेही सुरू ठेवले आहे. सध्या, फोर्डची भारतभरातील २६७ शहरांमध्ये ४६५ विक्री आणि सेवा केंद्रे आहेत. गाडीचा खर्च परवडण्याजोगा राहावा यासाठी फोर्डने अनेक उपक्रम प्रथमच सुरू केले. ग्राहकांच्या सोयीसाठी फोर्डने देशभरात अस्सल भाग विकण्यासाठी रिटेल वितरकांची नियुक्तीही केली असून, तीन हजार ५०० केंद्रांवर फोर्डचे अस्सल भाग उपलब्ध आहेत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link