Next
‘राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल’च्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, June 12, 2018 | 12:54 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलने सुशिक्षित वर्गापर्यंत पक्षाचे विचार पोहोचवावेत, आरोग्य क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांना मदतीचा हात द्यावा,’ असे आवाहन पुणे शहर अध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी केले.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलतर्फे ११ जून रोजी टिळक रोडवरील मराठ चेंबर ऑफ कॉमर्स येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर पुणे शहर राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे मावळते अध्यक्ष डॉ. दत्तात्रय गायकवाड, नूतन अध्यक्ष डॉ. सुनील जगताप, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सतीश बाबर व्यासपीठावर उपस्थित होते.                     

खासदार चव्हाण म्हणाल्या, ‘डॉक्टर मंडळी सुशिक्षित, प्रगल्भ समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. डॉक्टर सेलमधील डॉक्टर्सना अत्यावश्यक वैद्यकीय सेवेतून वेळ काढून पक्ष कार्य करावे लागते, तरीही उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून डॉक्टरांनी सेलचे उपक्रम सर्व स्तरात पोहोचवावेत. रुग्ण सेवेच्या क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहावे.’

डॉ. बाबर म्हणाले, ‘वैद्यकीय व्यवसायासमोर नवनवीन अडचणी उभ्या राहत आहेत. नव्याने या व्यवसायात येतील की नाही, अशी भीती निर्माण होत आहे. या अडचणी समजावून घेऊन त्यावर मार्ग काढला पाहिजे.’

राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल प्रदेशचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. या वेळी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील जगताप यांची निवड करण्यात आली. डॉ. बाबर यांनी नियुक्ती पत्र दिले. कार्याध्यक्षपदी डॉ. राजेश पवार, उपाध्यक्षपदी अजितसिंह पाटील, डॉ. सिद्धार्थ जाधव, तर सरचिटणीसपदावर डॉ. हेमंत तुसे यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते शहरअध्यक्ष डॉ. दत्तात्रय गायकवाड यांची प्रदेश कार्यकारिणीवर निवड जाहीर करण्यात आली.

या वेळी डॉ. सुनील होनराव, डॉ. दत्ता गायकवाड, डॉ. राजेश पवार, डॉ. सूर्यवंशी, डॉ. सुनील इंगळे, डॉ. गिरीश होनराव, डॉ. घारे, डॉ. नरेंद्र खेनट, डॉ. सुनील पायगुडे, डॉ. अर्जुन चव्हाण, डॉ. लालासाहेब गायकवाड, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. सुजाता बरगाळे, डॉ. शिवदीप उंदरे, डॉ. सुनीता काळे, डॉ. राहुल काळभोर, डॉ. राज लवंगे, डॉ. मुस्ताक तांबोळी, डॉ.अनिल लिंगडे, डॉ. भाऊसाहेब सोनावणे, डॉ. सुलक्षणा जगताप, डॉ. प्रदीप उरसळ,  डॉ. रवींद्र काटकर, डॉ. संभाजी करंडे, डॉ. दरक, डॉ. राजेश माने, अशोक राठी, मनाली भिलारे उपस्थित होते.

‘पुण्यामध्ये डॉक्टर्स सेलच्या पुणे शहर कार्यकारिणी व आठ ही विधानसभा मतदारसंघच्या कार्यकारिणीची निवड एक जुलै रोजी करण्यात येणार आहे. नव्या जोमाने डॉक्टर सेलच्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसायातील प्रश्न सोडवले जातील,’ असे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. जगताप यांनी सांगितले.

डॉ. राहुल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजेंद्र जगताप यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search