Next
‘एमआयटी’तर्फे यूपीएससी यशस्वितांचा सत्कार
कनिष्क कटारिया, अक्षत जैन, जुनैद अहमद यांच्याशी संवाद
BOI
Wednesday, July 10, 2019 | 05:59 PM
15 0 0
Share this article:

कनिष्क कटारिया, अक्षत जैन, जुनेद अहमद

पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे (मिटसोग) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी )२०१८ मधील परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी, १३ जुलै २०१९ रोजी सकाळी दहा वाजता ‘एमआयटी’च्या स्वामी विवेकानंद सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे.  

या वेळी देशातून प्रथम आलेल्या कनिष्क कटारिया, व्दितीय आलेला अक्षत जैन आणि तिसरा आलेला जुनैद अहमद यांच्यासह इतर यशस्वितांना गौरविण्यात येणार आहे. या परीक्षेत भारतातून प्रथम येणाऱ्यास शाल, ज्ञानेश्वरांची प्रतिमा, सन्मानपत्र व ५१ हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. व्दितीय क्रमांकास ३१ हजार रुपये रोख व तृतीय क्रमांकास २१ हजार रुपये रोख देण्यात येतील. महाराष्ट्रातून प्रथम आलेली व देशातून १६ वे स्थान मिळवणारी तृप्ती धोडमिसेही या वेळी उपस्थित राहणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना या टॉपर्सशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. 

या समारंभासाठी भारताचे माजी निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तेलंगणा राज्यातील राचीकोंडा येथील पोलीस आयुक्त महेश भागवत हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी ‘एमआयटी’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड असतील. या वेळी ‘एमआयटी’चे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search