Next
‘मुंबईतील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा’
जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचे आवाहन
प्रेस रिलीज
Saturday, March 16, 2019 | 03:13 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : मुंबईत ‘३० मुंबई दक्षिण-मध्य’ व ‘३१ मुंबई दक्षिण’ हे दोन लोकसभा मतदारसंघ असून, २४ लाख ५७ हजार २६ पात्र मतदार आहेत. मुंबईत २९ एप्रिल २०१९ रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. मुंबई जिल्ह्यातील सर्व मतदारांनी या वेळी आपला मतदानाचा हक्क बजावावा,’ असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले आहे.

३१ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार मुंबई जिल्ह्यात एकूण २४ लाख ५६ हजार ४९७ मतदार आहेत. त्यामध्ये १३ लाख ४४ हजार ९५५ पुरुष मतदार, तर ११ लाख ११ हजार ४३७ स्त्री मतदार आणि १०५ इतर अशी मतदारांची संख्या आहे. यात १८ ते १९ वयोगटातील १७ हजार ४०४ मतदार असून, ८० वर्षे वयापेक्षा अधिक असे एक लाख ३५ असे मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण दोन हजार ६०१ मतदान केंद्र आहेत. लोकसभेची निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी साधारणत: ३५ हजार कर्मचारी कार्यरत असतील.

आचारसंहिता तसेच निवडणूक खर्चाचे पर्यवेक्षण करण्यासाठी ४० फिरती पथके (Flying Squad), ३० स्थिर देखरेख पथके (Static Surveillance Team), २० दृकश्राव्य देखरेख पथके (Video Surveillance Team) व ११ दृकश्राव्य चित्रिकरण पथके (Video Viewing Team) विधानसभा मतदारसंघनिहाय स्थापन केली आहेत.   

नवीन मतदार नोंदणीबाबत माहिती आवश्यक असल्यास तसेच आचारसंहितेचा भंग किंवा निवडणुकीच्या खर्चासबंधी तक्रारीबाबत मुंबई जिल्ह्यासाठी तक्रार कक्षाचा १९५० हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केला आहे. केबल, दूरचित्रवाणी, सोशल मीडिया, तसेच इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे प्रसारित करावयाच्या निवडणूक जाहिरातीची पडताळणी व परवानगीसाठी मीडिया सर्टीफिकेशन व मॉनिटरिंग कमिटी (एमसीएमसी) स्थापन केली आहे.

‘मुंबई जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघापैकी सहा मतदारसंघ ‘३१ मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघात, तर उर्वरित चार विधानसभा मतदारसंघ ‘३० मुंबई दक्षिण-मध्य’ लोकसभा मतदारसंघात आहेत; तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यांतील अणुशक्तीनगर व चेंबूर हे दोन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत,’ अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search