Next
‘इस्रो’तर्फे पुण्यात अंतराळविषयक प्रदर्शन
१५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन
BOI
Saturday, February 09, 2019 | 12:50 PM
15 0 0
Share this article:


पुणे : विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्राची माहिती व्हावी, या उद्देशाने सुरेश नाईक एज्युकेशन सेंटर व पुणेकर एज्युकेशनल इनिशिएटिव्ह यांच्या पुढाकाराने ‘इस्रो’तर्फे पुण्यात येत्या १५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान अंतराळ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे हे प्रदर्शन भरणार आहे.

इस्रोचे माजी समूह संचालक सुरेश नाईक
कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग या उपक्रमाचे सह-प्रायोजक आहे. या वेळी सुरेश नाईक कब-सॅट डॉट कॉम या (sureshnaikcubsat.com) या संकेस्थळाचे अनावरण होणार असून, अंतरिक्ष विज्ञान या विषयावर ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ व ‘इस्रो’चे माजी समूह संचालक सुरेश नाईक यांचे भाषण होणार आहे. या प्रदर्शनात ‘इस्रो’ने प्रक्षेपित केलेल्या सर्व उपग्रहांची प्रतिरूपे, चांद्रयान व मंगळयान मोहिमेची क्षणचित्रे, विविध रॉकेट्स व सध्या अंतराळात असलेल्या उपग्रहांची प्रतिरूपेदेखील पहायला मिळणार असून, विद्यार्थ्यांना इस्रोच्या संशोधकांना भेटण्याची संधीही मिळणार आहे. 

हे प्रदर्शन १५ व १६ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सात या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी खुले असेल. इतर नागरिकांना या दोन्ही दिवशी संध्याकाळी चार ते सात या वेळेत हे प्रदर्शन पाहता येईल, तर १७ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे. 

या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पास असणे आवश्यक आहे. याकरिता इच्छुक शाळांनी नऊ ते तेरा फेब्रुवारी दरम्यान सकाळी दहा ते पाच या वेळेत संस्थेच्या कार्यालयाकडून पासेस घ्यावेत. विद्यार्थी आणि पालक किंवा नागरिक स्वतंत्ररीत्याही संस्थेशी संपर्क साधून पास घेऊ शकतात. तसेच प्रदर्शनस्थळीही पासेस मिळू शकतील. अशी माहिती पुणेकर एज्युकेशनल इनिशिएटिव्ह संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

‘सुरेश नाईक कब-सॅट’ कार्यशाळा 
विद्यार्थ्यांना उपग्रह, त्याचे प्रक्षेपण याचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी पुणेकर एज्युकेशनल इनिशिएटिव्हतर्फे ‘सुरेश नाईक कब-सॅट’ कार्यशाळाही आयोजित केली जाते. या दोन दिवसांच्या उपक्रमात उपग्रहाचे डिझाइन, बांधणी व प्रक्षेपण यांची सविस्तर माहिती शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येते. यात विद्यार्थ्यांना कब-सॅट उपग्रह आणि ग्राउंड स्टेशन तयार करण्याची संधी मिळते. हा कब-सॅट ड्रोनच्या साहाय्याने १५ ते २० मीटर उंचीवर पाठवला जातो. नंतर तो पॅराशूटच्या मदतीने ड्रोनपासून वेगळा होतो व वातावरणातील तापमान बदल आदी माहिती विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ग्राउंड स्टेशनवर पाठवतो. हा विलक्षण अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. जुलै २०१८मध्ये प्रथम पुण्यात अशी कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत पुणे आणि लोणावळा येथील शाळांमधील ८००पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खास तयार केलेले संक्षिप्त अभ्यासक्रम दिले जातात. त्यावर प्रवेश परीक्षा (एमसीक्यू) घेतली जाते. सहावी ते आठवी आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात येते. त्या कामगिरीवर आधारित विद्यार्थ्यांची निवड केली जाते. कार्यशाळा आयोजित करण्यासाठी शाळांनी संस्थेशी संपर्क करणे आवश्यक आहे. 

कार्यक्रमाविषयी 
इस्रो अंतराळ प्रदर्शन 
स्थळ : गणेश कला क्रीडा मंच 
दिवस : १५ ते १७ फेब्रुवारी २०१९
वेळ : विद्यार्थ्यांसाठी : १५ व १६ फेब्रुवारी, सकाळी नऊ ते संध्याकाळी सात. १७ फेब्रुवारी, सकाळी नऊ ते दुपारी एक. 
नागरिकांसाठी : १५ व १६ फेब्रुवारी, संध्याकाळी चार ते सात. 

पासेससाठी संपर्क :
श्रीमती अनिता : ९४२२३ ४४६०१
श्रीमती लीना : ८३८०० ७५६३१
पत्ता : नक्षत्र, भाग्योदयनगर,लेन क्रमांक-एक, सत्यानंद हॉस्पिटलजवळ, कोंढवा, पुणे-४११०४८

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
snehal shubham Fargade About 157 Days ago
nice
0
0
Aryan Rajesh Patle About 183 Days ago
Nice
0
0
Neelam Deshmane About 184 Days ago
Good
1
1
Rohit more About 185 Days ago
Thank you so much for this opportunity i love my india.... great isro
0
0
tanuja bhoi About 186 Days ago
very good
0
0
Sushilkumar Tirthkar About 186 Days ago
I am from kallamb, Osmanabad district, is it possible to attend the this exhibition to my school, if not! How i can arrange such exhibition in my district, please guide me.
3
0
Varad drshpande About 186 Days ago
Superb
0
1
Atharva About 186 Days ago
I am also interested for NASA project
1
2
Shivaji potdar About 186 Days ago
Students साठी खूप महत्वाचे प्रदर्शन , विदन्यान निष्ठा वाढेल,अवकाशाविषयीची अंधश्रद्ध दूर होईल आणि संशोधन वृत्ती जागृत होईल
1
0
Sai satav About 186 Days ago
It is very interesting project for NASA project
0
1
Sangram About 187 Days ago
Good initiative 👍
2
0
Mrs Aditi Paiyawal About 187 Days ago
Very nice & very good work
1
1
SURESH MANE About 187 Days ago
Nice info
1
0
Prachi Dhoke About 187 Days ago
Very informative
1
0
Mrs Badve About 187 Days ago
Very nice... helpful to children who are interested in this subject
2
0
Mrs.Surekha Throat Agarkar High school About 187 Days ago
Very thankful to you Mr.Suresh Naik. A great opportunity for students.
1
0
Sunil Mishra About 188 Days ago
This is what we needed to groom our India's future and to see her on top of world. Great iniative.
2
1
Exellent Idea About 188 Days ago
Great Programm this type of space initiatives should happen mostly in pune as pune is the home of Knowldege and knowledge spread Through ISRO should begin a Space industries like in America or China looking forward to technology's in this exhibition by HARDIK DESHPANDE
4
0
विजय एस चव्हाण About 188 Days ago
खूप छान, त्यामुळे मुलांच्या मध्ये संशोधन वृत्ती,खगोलशास्त्र ओळख, आवड, प्रेम निर्माण होऊन ज्ञानामध्ये भर पडेल . आभारी आहोत
1
1
वैभव वेदपाठक , कॅम्प हायस्कूल About 188 Days ago
खूप छान, त्यामुळे मुलांच्या मध्ये संशोधन वृत्ती,खगोलशास्त्र ओळख, आवड, प्रेम निर्माण होऊन भारताला एक चांगला खगोलशास्त्रज्ञ भेटेल अशी नक्कीच अपेक्षा आहे
1
0
Swati lakhan langer About 188 Days ago
Very nice it is exelant thing's of puture.
2
0
सोमनाथ सुरेश सोनवणे About 188 Days ago
खुप छान ! सतत मुलांना ज्ञान देणारे प़्रदर्शन भरवले तर त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल . आभारी आहे . ट
2
0
Priti Rohit Patel About 188 Days ago
Very good work .vry happy to see wth our kids.keep it up all children improvement work...
4
0
Swaleha Faruk Mulla About 188 Days ago
Can I have study tour of SYBSc(Computer Science) students on Saturday 16th Feb 2019, at 12.30, we have 129 students.
2
1
Mr.Ajay Landge About 189 Days ago
Hello im a principal of Bharati Vidyapeeth English Medium school lohegaon Pune want to show it to my students. Please revert back ASAP
3
0
Dr. Ajay Aserkar About 189 Days ago
Good initiative. But wrong timing. Board exams going on. So these students cannot attend. It should have been arranged earlier or later.
3
0
Anjali Dharme About 189 Days ago
Very good initiative!
3
0
Vinod Balasaheb Dhepe About 190 Days ago
My son was interested in joining Istro after 12th He is now student of 4th class at Mukangan English Medium school Pune
2
0
Prof. Korde Prasad Dattatraya About 190 Days ago
Best initiative for science students will surely come to visit
9
0

Select Language
Share Link
 
Search