Next
रत्नागिरीत १७ मार्चला कर्करोग चिकित्सा शिबिर
BOI
Saturday, March 16, 2019 | 02:18 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : येथील लायन्स क्लब, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि डेरवण (ता. चिपळूण) येथील बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने १७ मार्च २०१९ रोजी मोफत कर्करोग चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात सकाळी १० ते दुपारी दोन या वेळेत होईल. यात रुग्ण तपासणी करण्यासाठी वालावलकर हॉस्पिटलमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैशाली गायकवाड-सुरसे, कर्करोग तज्ज्ञ डॉ. नंदिनी शर्मा, डेंटल सर्जन डॉ. आसावरी मोडक हे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिबिरात सहभागी होण्यासाठी आधी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

शिबिराविषयी :
दिवस :
रविवार, १७ मार्च २०१९
वेळ : सकाळी १० ते दुपारी दोन
स्थळ : बाह्य रुग्ण विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी.
नावनोंदणीसाठी संपर्क :
रामेश्वर म्हेत्रे :
९९२२१ ३९८१०
प्राची जाधव : ९७३०२ ३५७८८
बबिता शेळके : ९८९०७ ६४१९७
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link