Next
‘सीआयआय’तर्फे परिषदेचे आयोजन
भारतात लॉजिस्टिक्स उद्योगक्षेत्राची भरारी
प्रेस रिलीज
Saturday, May 04, 2019 | 12:00 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : देशाच्या विकासात लॉजिस्टिक्स क्षेत्र बजावत असलेली महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने (सीआयआय) ‘स्टॅंडर्डायझेशन इन लॉजिस्टिक्स २०१९- अ स्टेप टुवर्डस एक्सेलरेटिंग लॉजिस्टिक्स सेक्टर ग्रोथ’ (लॉजिस्टिक्समधील प्रमाणबद्धता- लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या वाढीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल) या विषयावर एका परिषदेचे आयोजन केले होते.

या परिषदेत बोलताना केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सहसचिव अनंत स्वरूप म्हणाले, ‘लॉजिस्टिक्ससाठी होणाऱ्या खर्चात घट व्हावी व देशासाठी कामगिरी सूचकांकात सुधारणा व्हावी यासाठी लॉजिस्टिक्स विभाग प्रयत्नशील आहे. या उद्योगक्षेत्रात प्रमाणबद्धता आणणे हे त्या दृष्टीने उचलले जाणारे महत्त्वाचे पाऊल आहे.  आमच्या विभागाने सादर केलेल्या राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण मसुद्यातही प्रमाणबद्धता मुद्द्याचा समावेश होता.  हे प्रत्यक्षात घडून यावे यासाठी ‘सीआयआय’ व लॉजिस्टिक्स उद्योगक्षेत्राकडून सहयोग मिळेल अशी आशा आम्ही व्यक्त करतो.’  

‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स’च्या महासंचालिका सुरिना राजन म्हणाल्या, ‘‘बीआयएस’ हा आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत मानकांना जोडणारा दुवा आहे. लॉजिस्टिक्समध्ये प्रमाणबद्धता यावी यासाठी हे उद्योगक्षेत्र व सीआयआय एकत्र येऊन काम करत आहेत हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे. या उपक्रमाला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.’

सीआयआय नॅशनल कमिटी व लॉजिस्टिक्सचे सदस्य आणि महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडचे सीईओ पिरोजशा सरकारी म्हणाले, ‘लॉजिस्टिक्स विभाग स्थापन करून सरकारने या क्षेत्राच्या विकासाला चालना दिली आहे. महत्त्वाचा विषय म्हणून गेल्या वर्षी आम्ही लॉजिस्टिक्समधील प्रमाणबद्धतेला प्राधान्य दिले. पॅलेट असो वा वाहनाचा आकार असो, गोदामे, कंत्राटे, करार किंवा वाहनचालकांसाठीच्या सुविधा असोत, प्रत्येक बाबतीत संपूर्ण उद्योगक्षेत्रात प्रमाणबद्धता असलीच पाहिजे.  प्रमाणबद्धतेच्या अभावामुळेच आपल्या देशामध्ये इतर देशांपेक्षा लॉजिस्टिक्सच्या किंमती जास्त आहेत. मी असे मानतो की, ‘मेक इन इंडिया’ यशस्वी होण्यासाठी ‘मूव्ह इन इंडिया’ (भारतातील व्यावसायिक वाहतूक व्यवस्था) सक्षम असणे आवश्यक आहे. एकसमान प्रमाणबद्धतेच्या दिशेने सुरू झालेल्या या प्रवासात अनेक अडथळे येतील. यामध्ये यश नक्कीच मिळेल.’

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search