Next
लोहगाव विमानतळ विस्तारीकरण बैठक
प्रेस रिलीज
Monday, March 19 | 03:09 PM
15 0 0
Share this story

पुणे : लोहगाव विमानतळ विस्तारीकरण आणि अन्य विविध विकासकामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची खासदार अनिल शिरोळे यांनी १७ मार्च रोजी लोहगाव विमानतळ येथे प्रत्यक्ष पाहणी केली. 

या वेळी घेतलेल्या बैठकीत, लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण, विमान उड्डाण संख्येत वाढ तसेच, विमानतळ परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी समांतर रस्ता निर्मिती याविषयी चर्चा घेण्यात आल्याचे, खासदार अनिल शिरोळे यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले. 

या बैठकीला विमानतळ संचालक अजय कुमार, पुणे महानगरपालिकेच्या पाठ विभागाचे राजेंद्र राऊत, सत्यजित थोरात आदि अधिकारी उपस्थित होते. 

केंद्रीय पायाभूत समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यासमवेत लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरण संबंधी झालेला पत्रव्यवहार, तसेच त्यानंतर गडकरींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेतलेल्या विविध निर्णयांच्या वेळेत तसेच यशस्वी अंमलबजावणीसाठी, यापुढील काळातदेखील अशा प्रकारची प्रत्यक्ष पाहणी आणि बैठक घेणार असल्याचे, शिरोळे म्हणाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link