Next
पुण्यात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सव
प्रेस रिलीज
Thursday, January 24, 2019 | 04:44 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवाचे संचालक शामहरी चक्रा व संस्कृतीकी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत २६ व २७ जानेवारी २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सव आयोजित केला आहे. यात भरतनाट्यम, कथ्थक, ओडिसी, मणिपुरी, कुचीपुडी, मोहिनी अट्टम, लावणी, फ्लेमेंको, सत्तरिया, छाऊ, आदी नृत्यप्रकार या दिवसीय सादर केले जातील’, अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे आणि महोत्सव संयोजक रसिका गुमास्ते यांनी दिली.

महोत्सवाचा शुभारंभ ज्येष्ठ नृत्यांगना गुरू मनीषा साठे, शमा भाटे, सुचेता चाफेकर, श्यामहरी चक्रा यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवाची वेळ सकाळी १० ते रात्री नऊपर्यंत वेळ राहील. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात चेन्नई, बंगलोर, भुवनेश्वर, मुंबई येथील अनुसुया राव, अमरनाथ घोष, प्रियांका भिडे आदी कलाकार त्यांची कला सादर करणार आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यावरील सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात तो होणार आहे.

महोत्सवाविषयी :
दिवस : २६ व २७ जानेवारी २०१९
वेळ : सकाळी १० ते रात्री नऊ
स्थळ : सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link