Next
‘पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज’
हिमायतनगरमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून शहीद जवानांना श्रद्धांजली
नागेश शिंदे
Saturday, February 16, 2019 | 12:16 PM
15 0 0
Share this storyहिमायतनगर :
‘काश्मिरातील पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४०हून अधिक जवान शहीद झाले. या घटनेचा निषेध करावा तितका कमीच आहे. आता पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे, ’ असे प्रतिपादन शिवसेनेचे हिमायतनगर तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे यांनी केले.दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात वाजता परमेश्वर मंदिर परिसरात सर्व जण जमले होते. या वेळी वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून, दहशतवाद्याचा पुतळा जाळून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या वेळी हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे, मुन्ना जन्नावार, शहराध्यक्ष प्रकाश रामदिनवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन तुप्तेवार, प्रसाद डोंगरगावकर, रमेश कोमावार, पापा पर्डीकर, नाथा पाटील, राम नरवाडे, गजानन चायल, पत्रकार प्रकाश जैन, अनिल मादसवार, विशाल राठोड, बंडू अनगुलवार, गजानन पाळजकर, पमूदादा भोयर, शुभम दंडेवाड, अजय बेदरकर, सालीम शेवाळकर, मंगेश धुमाळे यांच्यासह भाजप, शिवसेना, काँग्रेस अशा विविध पक्षांचे, तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी बांधव या वेळी उपस्थित होते. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link