Next
फारोख कूपर यांना जीवनगौरव पुरस्कार
प्रेस रिलीज
Tuesday, January 29, 2019 | 03:26 PM
15 0 0
Share this article:

फरोख कूपरसातारा : पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दलचा पहिला मानांकित जीवनगौरव पुरस्कार कोरडवाहू शेतीमध्ये खरी सधनता आहे हे दाखवून देणारे सातारा जिल्ह्यातील उद्योजक फरोख कूपर यांना जाहीर करण्यात आला आहे. एक फेब्रुवारी २०१९ रोजी पुणे येथे आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनात हा पुरस्कार कूपर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

भारतीय कृषी संस्कृतीमध्ये मराठी कृषी परिवर्तनाची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या या कृषी महाविद्यालयाला १११ वर्षांची परंपरा आहे. कृषी विज्ञान दृष्टीकोन ठेऊन लाखो कृषी पदवीधर, काही शास्त्रज्ञ या महाविद्यालयातून तयार झाले आहेत. कृषी विज्ञान प्रयोगशाळा या नात्याने कृषी महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना काम करत असून एक फेब्रुवारीला माजी विद्यार्थ्यांचे संमेलन पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यावेळी कूपर यांच्याबरोबरच कृषी अभिमान पुरस्कार कृषी शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानदेव हापसे यांना व कृषी सन्मान पुरस्कार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना प्रदान केला जाणार आहे. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, संघटनेचे गौरवचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘उद्योजक फरोख कूपर व त्यांचे वडील नरिमन कूपर हे कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी भारतीय कृषी व्यवसायात निकृष्ट शेतीत उत्कृष्ट कृषी उत्पादन घेता येते हे सिद्ध केले आहे. यासाठीच कृषी पदवीधरांमधील पहिला मानांकित ठरलेला जीवनगौरव पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. कृषी परिवर्तन चळवळ अधिक कार्यक्षम करून महाराष्ट्रातील शेतीमधून खरी उत्पादकता सिद्ध करण्याचे कृषी पदवीधर संघटनेने ठरवले असून, पारंपरिक शेतीला आता वळणदार वळण देऊन त्यातील उत्पादकता जागतिक गुणवत्तेवर मानांकित करण्याची भूमिका स्वीकारून त्या दिशेने क्रांतीकारक पाऊल उचलण्यासाठी पुणे येथे कृषी संग्रहालय, विशेष अतिथीगृह व शेतकरी प्रशिक्षण सभागृह उभारले जाणार आहे,’ अशी माहिती संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. बळवंतराव जगताप यांनी दिली.

ते म्हणाले, ‘भारतीय शेती एका संक्रमणाच्या कालखंडातून जात असताना वैज्ञानिक दृष्टीकोनातून गुणवत्ता व उत्पादकता या क्षेत्रात क्रांतीकारक परिवर्तन करण्याचा संघटनेचा कार्यक्रम आहे. सेंद्रिय शेती, करार शेती, गट शेती आणि मातीविना शेती असे अनेक प्रयोग कृषी पदवीधर संघटना राबवणार असून, त्यासाठी कृषी विद्यापीठांचे सहकार्य घेतले जाणार आहे.’

‘२१व्या शतकातील शेतकरी हा विकासाभिमुख करण्याची आमची भूमिका आहे. जागतिकीकरणानंतर कृषी साधनांमध्ये मानांकित ठरणारी यांत्रिकता कूपर उद्योग समुहाने निर्माण केली. नांगरापासून डिझेल इंजिन आणि इकोपॅक जनसेटपासून अद्ययावत ट्रॅक्टरपर्यंत निर्मिती करून फरोख कूपर यांनी जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवले आहे. तरीही ते हाडाचे शेतकरी आहेत. म्हणून हा पहिला जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान केला जात आहे,’ असे जगताप यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search