Next
विक्रम सेठ, डॉ. प्र. ल. गावडे
BOI
Wednesday, June 20, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

१३४९ पानांची आणि पाच लाख ९१ हजार ५५२ शब्दांची, चार कुटुंबांची कथा मांडणारी ‘ए सुटेबल बॉय’ ही गलेलठ्ठ कादंबरी लिहून प्रसिद्ध झालेले विक्रम सेठ आणि विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांचा २० जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.....
विक्रम सेठ

२० जून १९५२ रोजी कोलकात्यात जन्मेलेले विक्रम सेठ हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवी, कादंबरीकार आणि प्रवासवर्णनकार आहेत. ‘फ्रॉम हेवन लेक’ हे त्यांचं विनोदप्रचुर प्रवासवर्णन लोकांना आवडलं होतं. छंदोबद्ध स्वरूपात लिहिलेली ‘दी गोल्डन गेट’ ही त्यांची पहिलीच कादंबरी गाजली होती. सॅन फ्रॅन्सिस्कोमधल्या मॉडर्न तरुणाईची ती कथा त्यातल्या वेगळ्या काव्यमय रचनेमुळे लक्षवेधी ठरली होती. 

त्यांची पुढची १३४९ पानांची आणि पाच लाख ९१ हजार ५५२ शब्दांची चार कुटुंबांची कथा मांडणारी ‘ए सुटेबल बॉय’ ही गलेलठ्ठ कादंबरी तर तुफान गाजली. खुद्द इंग्लिश भाषेतही एवढ्या प्रचंड वस्तुमनाच्या कादंबऱ्या फारशा नाहीत. त्यांची १९९९ सालची ‘अॅन इक्वल म्युझिक’ ही कादंबरीसुद्धा लक्षवेधी ठरली. ‘ए सुटेबल गर्ल’ या त्यांच्या नवीन कादंबरीची सर्वांना उत्सुकता आहे. 

भारत सरकारकडून पद्मश्री सन्मान मिळालेल्या विक्रम सेठ यांना साहित्य अकादमी पुरस्कार, प्रवासी भारतीय सन्मान, क्रॉसवर्ड बुक अॅवॉर्ड असे सन्मान मिळाले आहेत. 
........ 

डॉ. प्रभाकर लक्ष्मण गावडे

२० जून १९२४ रोजी जन्मलेले डॉ. प्रभाकर लक्ष्मण गावडे हे विचारवंत नि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘सावरकर : एक चिकित्सक अभ्यास’ हा प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवली होती.

सावरकरांचे साहित्यविचार, श्रीज्ञानेश्वर वाङ्मयसूची, कवी यशवंत : काव्यरसग्रहण, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. त्यांना पु. भा. भावे समीक्षा पुरस्कार, तसंच ना. गो. चापेकर पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत.

(डॉ. प्र. ल. गावडे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link