Next
‘सिस्का’तर्फे दोन नाविन्यपूर्ण उत्पादने
प्रेस रिलीज
Saturday, January 27 | 04:19 PM
15 0 0
Share this story

मुंबई : सिस्का एलइडी या तंत्रज्ञानातील सर्वोत्तम नावीन्यपूर्णतेसह एलइडी लाइटिंगमधील प्रमुख असलेल्या उत्पादनाने आपल्या कॅटलॉगमध्ये दोन नव्या नाविन्यपूर्ण उत्पादनांची भर घातली आहे. सिस्काने ड्युअलाइट बल्ब आणि ट्रीटोन लाइट्स सादर केले असून, यामुळे एलइडी लाइटनिंगच्या पोर्टफोलिओमधील श्रेणींचा विस्तार झाला आहे.

या नव्याने सादर करण्यात आलेले एलइडी लाइट्स अनोखे आहेत आणि घरगुती व ऑफिसच्या वापरासाठी जागतिक स्तरावरील नावीन्यपूर्णतेने सादर करण्यात आले आहेत. ड्युअलाइट बल्बमध्ये ६५०० के आणि तीन हजार असे पर्याय देण्यात आले आहेत. सीसीटी मॅन्युअल स्विचिंगद्वारे पाच सेकंदांच्या इंटरवलमध्ये बदलता येतात. पाच, सात, नऊ आणि १२ अशा वॉल्टेजमध्ये उपलब्ध आहेत.

तीन टप्प्यांच्या मॅन्युअल स्विचिंगमध्ये ‘ट्रीटोन’ डिम करता येतात. पहिले स्वीच १०० टक्के, दुसरे स्वीच ५० टक्के आणि तिसरे स्वीच ३० टक्के सक्षम आहेत. एलयूएक्सच्या गरजेनुसार मूड लाइटिंग करण्यासाठी उपयुक्त आहेत.

या उद्घाटनाविषयी सिस्का ग्रूपचे संचालक राजेश उत्तमचंदनानी म्हणाले की, ‘आमच्या ग्राहकांनी सर्वोत्तम एलइडी लाइट्सचा अनुभव घ्यावा, अशी आमची इच्छा असते. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्णतेसह ऊर्जा सक्षम लाइट्स असावेत. ‘सिस्का’ने नेहमीच आमच्या उत्पादनातील नाविन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रीत केले आहे आणि ड्युअलाइट आणि ‘ट्रीटोन’चे उद्घाटन केले. आम्ही यापुढेही एलइडी लाइट्सच्या बाजारपेठेत नेहमीच सर्वोत्तम सेवा देऊ असे आम्ही ग्राहकांना वचन देतो.’

सिस्का एलइडीने घरगुती आणि ऑफिसच्या लाइटिंगसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एलइडीच्या उपाययोजना दिल्या आहेत. सिस्का एलइडीच्या उत्पादनांची लिस्ट विस्तारीत आहे. यात विविध बल्ब, सेलिंग लाइट्स, स्पॉट लाइट्स, ट्यूब लाइट्स, इमर्जन्सी लाइट्, इलेक्ट्रीकल अॅक्सेसरीज आणि स्ट्रीप लाइट्स यांचा समावेश आहे.

विविध आकार, प्रकार आणि रंगांमध्ये तसेच वॅट पॉवर आणि त्याच्या प्रकारांत हे एलइडी लाइट्स जागतिक स्तरावरील दर्जा आणि वर्गानुसार तयार करण्यात आले आहेत. सर्व उत्पादने आकर्षक दिसतील अशाप्रकारे तयार करण्यात आली आहेत. यांच्या लाइटमुळे घरे आणि ऑफिसांचा पूर्णपणे मेकओव्हर होणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link