Next
कलार्पण लघुपट महोत्सवाचे पारितोषिक वितरण १४ जुलैला
BOI
Friday, July 12, 2019 | 05:46 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘कलार्पण आणि सृष्टी दी कम्प्लीट मेकओव्हर संस्था यांच्या वतीने आयोजित लघुपट महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ १४ जुलै रोजी पुणे भारत गायन समाज येथे दुपारी तीन वाजता होणार आहे,’ अशी माहिती कलार्पण संस्थेचे संस्थापक मंदार तळणीकर व सृष्टी संस्थेचे संस्थापक श्रीकांत गोरे यांनी दिली.

‘या महोत्सवामध्ये सुमारे १०० लघुपट सहभागी झाले होते. या वेळी विजेत्या तीन संघांना रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याबरोबरीने सर्वोत्तम अभिनय, दिग्दर्शन, बालकलाकार, कथा, पटकथा, संवाद, संकलन, रंगभूषा, वेशभूषा, कलादिग्दर्शन आदी पुरस्कारही देण्यात येणार आहेत. पुरस्कारांचे वितरण सुरमणी पं. डॉ. सुधाकर तळणीकर, प्रवीण डोंगरे, नीता नागवंशी यांच्या हस्ते करण्यात येणार असून, या वेळी गौतम बेलवटे, सिने अभिनेते सागर पाबळे, दिलीप केदार, विकास महाजन, मनोज चौधरी, डॉ. शिरीष शेपाळ, कविता गव्हाळे, वृषाली तळणीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

‘या वेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते सुरमणी पं. डॉ. सुधाकर तळणीकर आणि त्यांचे शिष्य ‘अभंगवाणी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. सुविधा आयुर्वेदिक संशोधन केंद्र यांच्या वतीने ‘स्व. आप्पासाहेब विश्वासराव शेपाळ’ पुरस्कारांचे वितरणदेखील करण्यात येणार आहे,’ अशी माहिती संयोजकांनी दिली.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search