Next
व्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंज
प्रेस रिलीज
Friday, January 12 | 11:41 AM
15 0 0
Share this story

मुंबई :  भारताच्या खासगी क्षेत्रातील पाचव्या क्रमांकावरील सर्वात मोठी बँक येस बँक व व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूआइएफ) यांनी संयुक्तपणे व्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंज ही स्पर्धा आयोजित केली होती. आपल्या अर्थव्यवस्थेचे सबलीकरण व्हावे आणि बदलासाठी अधिक चांगले स्रोत उपलब्ध असावेत, तसेच भारतीय स्टार्ट अप्सना जागतिक स्तरावर व्यासपीठ उपलब्ध व्हावे, म्हणून या चॅलेंजचे आयोजन करण्यात आले होते.

एड्युवांझ फायनान्सिंग प्रायव्हेट लिमिटेडने ‘परीक्षकांची पसंती’ हा पुरस्कार पटकावला. बैठकीला उपस्थित असलेले मान्यवर, प्रायोजक आणि ग्लोबल मीडियाच्या प्रेक्षकांसमोर दहा अंतिम स्पर्धकांमधून कंपनीने ही पसंती मिळवली आहे. उच्चतम दर्जाच्या परिणामांसाठी विद्यार्थ्यांसाठी प्रमाणित व्यासपीठाची उभारणी करणे, ही एड्युवान्झ फायनान्सिंग प्रायव्हेट लिमिटेडची प्रमुख कल्पना होती. पुरस्कार म्हणून त्यांना प्रमाणपत्र आणि बारा हजार यूएस डॉलर्सचे बक्षीस देण्यात आले.
 
व्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंजचा भाग म्हणून व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरमने द थ्री सिस्टर्स इन्स्टिट्युशनल ऑफिसच्या संस्थापिका राखी कपूर टंडन यांचा ‘वुमन आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मान केला.

भारतीय स्टार्ट अप इकोसिस्टीम आणि ख्यातनाम वित्तीय संस्था, तसेच भारतातील अनेक विचारवंतांचा परीक्षक मंडळात समावेश होता. यात रेहान यार खान (मॅनेजिंग डायरेक्टर, ओरिओस व्हेंचर पार्टनर), संदीप मूर्थी (पार्टनर लाइटबॉक्स व्हेंचर), शिवानी भसीन सचदेव (एमडी आणि सीईओ, इंडिया अल्टरनेटिव), करण मोहला (एक्झुकेटिव डायरेक्टर, आयडीजी व्हेंचर्स इंडिया), प्रीती सिन्हा (सिनियर प्रेसिडंट आणि ग्लोबल कन्व्हेनर, येस ग्लोबल इन्स्टिट्यूट, येस बँक) आणि विशाल खरे (डायरेक्टर, एंटरप्राइज, सिट्रिक्स इंडिया अँड एंजेल इन्व्हेस्टर) यांचा समावेश आहे.

या विकासाविषयी येस बँकेचे एमडी आणि सीईओ राणा कपूर म्हणाले, ‘व्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंजचा भाग असल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे. यामुळे पुढे येऊ इच्छिणाऱ्या नव्या व्यावसायिकांना योग्य त्या पायाभूत सुविधा आणि स्रोत उपलब्ध करून देण्याचा आमचा राष्ट्रीय हेतू सफल होणार आहे; शिवाय नोकरीच्या मोठ्या संधीही निर्माण होणार आहेत. सहभागी झालेल्या सर्व स्टार्ट अपचे मी अभिनंदन करतो आणि त्यांचे हे उद्योगजकतेचे स्पिरिट पुढेही असेच राहावे, यासाठी प्रोत्साहन देतो.’

रुबन ब्रिज, ड्राफ्ट स्पॉटिंग टेक्नोलॉजिज, साउंडरेक्स, एड्युवान्झ फायनान्सिंग, गेमझोप, कर्न्फम टिकेट, पर्पल, प्लेक्सस, अॅनेक्सी आणि सरल डिझाइन आदी स्पर्धक सर्वोत्तम दहा अंतिम स्पर्धक म्हणून निवडले गेले. अंतिम स्पर्धकांमधील तीन निवडक स्टार्टअपना प्रेक्षकांचा ‘पॉप्युलर चॉईस अवॉर्ड’ मिळाला. ड्राफ्टस्पॉटिंग टेक्नोलॉजिजला प्रेक्षकांकडून लोकप्रिय स्टार्टअपचे मत देण्यात आले, शिवाय त्यांना सहा हजार यूएस डॉलर्सचे बक्षिस मिळाले. लोकांनी सरल डिझाइनला ‘सर्वोत्तम प्रदर्शनकार’ म्हणून पसंती दिली आणि त्यांना दोन हजार यूएस डॉलर्सचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

व्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंजने पाचव्या भागात स्टार्ट अपचे प्रदर्शन सुरू करण्याचे ठरवले आहे. यामुळे प्रदर्शनाला भेट देणारे लोक, सहभागी झालेले स्पर्धक, तसेच गुंतवणूकदार आणि मेंटॉर यांनाही व्यवसायाचे सादरीकरण देता येईल. 
अंतिम फेरीतील स्पर्धकांबरोबरच जागतिक स्तरावरील दहा इतर प्रदर्शकही असणार आहेत, यात लुहारिया टेक्नॉलॉजिज प्रा. लि., आयआयटी मद्रास इन्क्युबेटेड लॅब्ज, बुलबुल अॅप्स, वेअर नाऊ सर्व्हिसेस, कॅपझेस्ट, येस फिनटेक अॅक्सरेलेटेड सिग्नझी टेक्नॉलॉजिज, इनोव्हेशन, मुडी पुडल फूड्स, निरामई आणि स्केपिक आदींचा कार्यक्रमातील माजी स्टार्ट अप प्रदर्शनकार म्हणून समावेश आहे.

व्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंजबद्दल
व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूआयइएफ)तर्फे भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणातील आर्थिक आणि व्यावसायिक बैठकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलेले हे स्टार्ट अप चॅलेंज आहे. व्हॉर्टन इंडिया स्टार्ट अप चॅलेंजचा हा पाचवा भाग असून, भारताच्या अर्थक्षेत्रातील अग्रणी गुंतवणूकदार आणि उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांपर्यंत पोहोचण्यासाठीचे हे उपयुक्त व्यासपीठ आहे. स्थापनेपासून डब्ल्यूआयएससीने वीसपटीने विकास केला आहे. केट्टो, झोस्टेल आणि बेबीचक्रा यासारख्या कंपन्यांसाठीचे ते यशस्वी व्यासपीठ ठरले आहे.

येस बँकेबद्दल थोडेसे
देशभरात २९ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांमध्ये विस्तार असलेली, एलपीआयडी जिल्ह्यातील लोअर परेल या मुंबईच्या नावीन्यपूर्ण जिल्ह्यात (एलपीआयडी) मुख्य कार्यालय असलेली; येस बँक ही भारतातील खासगी क्षेत्रातील पाचव्या क्रमांकावरील सर्वात मोठी बँक आहे. तिचे संस्थापक राणा कपूर यांच्या व्यावसायिक आणि उद्योजकीय प्रयत्नांनी ती या स्थानी पोहोचली आहे. तसेच त्यांच्या टीमची उत्तम दर्जाची निर्मिती व ग्राहककेंद्री, सेवाकेंद्री प्रयत्नांमुळे ही खासगी भारतीय बँक भारताची भविष्यकालीन व्यवसाय सेवा पुरवेल.

येस बँकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम अभ्यास केला असून, बँक ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा, सक्षम ऑपरेशन्स आणि व्यापक बँक व्यवहार आणि वित्तीय उपाययोजना पुरवते.

येस बँकेचा दृष्टीकोन हा माहितीवर आधारित आहे आणि बँक किरकोळ, कॉर्पोरेट ग्राहकांना आणि उदयोन्मुख कार्पोरेट बँकिंग ग्राहकांना उत्तम दर्जेदार सेवा पुरवते. दीर्घकालीन मिशनच्या साह्याने ‘२०२०’ पर्यंत जगातील सर्वोत्कृष्ट बँक भारतात स्थापन करण्याचे बँकेचे प्रयत्न आहेत.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Archana Ankush Narle About 35 Days ago
Co H ushnpasha miyasab Ajeej khan Pune city Pune maharashtra. 411039
0
0

Select Language
Share Link